ओझर परिसरात १४ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 00:42 IST2021-05-10T23:18:46+5:302021-05-11T00:42:02+5:30
ओझरटाऊनशिप : ओझरसह परिसरात गेल्या ११ दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट होत आहे, ही बाब ओझरकरासाठी दिलासाजनक असून सोमवारी १४ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत.

ओझर परिसरात १४ बाधित
ठळक मुद्दे १२७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.
ओझरटाऊनशिप : ओझरसह परिसरात गेल्या ११ दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट होत आहे, ही बाब ओझरकरासाठी दिलासाजनक असून सोमवारी १४ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत.
ओझरसह परिसरातील जनता कर्फ्यूमुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. ओझरसह परिसरात सोमवारी (दि.१०) १४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता ओझरसह परिसरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या एकूण ४,३७५ झाली आहे, पैकी १२७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. ४,१२६ रुग्ण बरे झाले असून, १२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी १५ रुग्णालयात असून, १०७ रुग्ण घरीच क्वारंटाईन होऊन उपचार घेत आहेत.