रस्ते दर्जोन्नतीसाठी १४ कोटी २७ लक्ष मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 07:42 PM2018-08-30T19:42:33+5:302018-08-30T19:43:10+5:30
ग्रामविकास विभाग अंतर्गत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २०१८-१९ या वित्तीय वर्षात मालेगाव तालुक्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २३.२३ कि.मी. रस्त्याच्या दर्जोन्नतीच्या कामासाठी १४ कोटी २७ लक्ष निधी मंजूर झाल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.
मालेगाव तालुक्यातील भायगाव वजीरखेडे या ३.५१० कि.मी. रस्त्याच्या दर्जोन्नतीच्या २ कोटी २ लक्ष निधी तर राज्यमार्ग १० करंजगव्हाण ते कंक्रळे-निमशेवडी-वळवाडी-वळवाडे रस्ता या ७.८६० किमी रस्त्याच्या दर्जोन्नतीच्या ४ कोटी ६७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मालेगाव कॅम्प ते दाभाडी साखर कारखाना रस्ता या ४.१४० कि.मी. रस्त्याच्या दर्जोन्नतीच्या २ कोटी ३२ लक्ष रुपये, खाकुर्डी ते मोरदर रस्ता ४.४२० कि.मी. लांबीच्या या रस्त्यास ३ कोटी ८ लक्ष रु पये आणि साजवाळ ते भिलकोट ३.३०० कि.मी रस्त्त्याच्या कामासाठी २ कोटी १७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर रस्त्यांच्या कामांची पाचवर्षे नियमीत देखभाल व दुरूस्तीसाठी ७ लक्ष ८७ हजार रुपये मंजुर करण्यात आले. ग्रामीण भागात रस्त्यांच्या दर्जोन्नतीच्या कामांमुळे मालेगाव तालुक्यातील जनतेस वाहतुकीसाठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.