मनपा मुख्यालयातील १४ कर्मचारी पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:16 AM2021-03-23T04:16:25+5:302021-03-23T04:16:25+5:30
शहरात गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहेत. त्यामुळे महापालिकेने कोरोना चाचण्या वाढवल्या आहेत. तसेच लसीकरण मोहिमेलादेखील गती दिली ...
शहरात गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहेत. त्यामुळे महापालिकेने कोरोना चाचण्या वाढवल्या आहेत. तसेच लसीकरण मोहिमेलादेखील गती दिली आहे. दुकाने बाजारपेठांवर निर्बंध घातल्यानंतरदेखील रुग्णांची संख्या वाढत असल्याने अखेरीस आता त्याचा अभ्यास करून प्रशासनाने सुपर स्प्रेडर्स शोधून त्यांच्या चाचण्या करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रस्त्यावरील भाजीविक्रेते, सुरक्षारक्षक, रिक्षाचालक अशा अनेक विक्रेते व्यावसायिकांची चाचणी करण्यात येत आहेत. परंतु त्याचबरोबर महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीदेखील मोठ्या जनसंपर्कात असल्याने त्यांचीही चाचणी करण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार गेल्या आठवड्यापासून महापालिकेच्या मुख्यालयातदेखील तपासणी सुरू करण्यात आली आहे. एकूण १९७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यात १४ कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. संबंधितांना ते पॉझिटिव्ह असल्याचे माहिती नव्हते तसेच त्यांच्यात तशी लक्षणेदेखील नव्हती. मात्र, महापालिकेने तपासणी केल्यानंतर संसर्गाचा उलगडा झाला. तोपर्यंत ते राजकीय नेते कार्यकर्ते, नगरसेवक, अधिकारी अशा सर्वांच्याच ते संपर्कात हेाते. त्यामुळे महापालिकेत संबंधितांचे धाबे दणाणले आहे.
इन्फो..
महापालिकेत यापूर्वीदेखील अनेक कर्मचारी बाधत झाले हेाते. त्यावेळी त्यांना त्रास होत असल्याने चाचणी केल्यानंतर कोरोना संसर्ग झाल्याचे उघड झाले होते. मात्र आता कोणत्याही लक्षणाशिवाय हे कर्मचारी बाधित असल्याचे आढळले आहे. त्यामुळे आता हे कर्मचारी कोणाकोणाच्या संपर्कात होते हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरले आहे.