१४ अवैध शस्रे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 11:24 PM2019-10-15T23:24:10+5:302019-10-16T00:56:35+5:30

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आठवडा शिल्लक राहिला असून, आचारसंहिता काळात परवानाधारक शस्रेदेखील पोलिसांकडे जमा करावी लागतात; मात्र शहरात १४ व्यक्तींनी शस्रे कुठलेही सबळ कारण पोलिसांना न देता स्वत:जवळच बाळगल्याने त्यांची शस्रे अवैध ठरवून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

१४ Illegal weapons seized | १४ अवैध शस्रे जप्त

१४ अवैध शस्रे जप्त

Next
ठळक मुद्देआचारसंहिता : २८७ परवानाधारकांची २१० शस्रे जमा

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आठवडा शिल्लक राहिला असून, आचारसंहिता काळात परवानाधारक शस्रेदेखील पोलिसांकडे जमा करावी लागतात; मात्र शहरात १४ व्यक्तींनी शस्रे कुठलेही सबळ कारण पोलिसांना न देता स्वत:जवळच बाळगल्याने त्यांची शस्रे अवैध ठरवून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये तयार करण्यात आलेल्या समितीच्या निर्देशानुसार शहरातील सुमारे १२८५ परवानाधारकांपैकी २७६ परवानाधारकांची २९२ शस्रे तात्पुरते जमा करण्याबाबत तसेच परवाना नूतनीकरण न केलेल्या ११ परवानाधारकांकडील ११ शस्रे अशी एकूण २८७ परवानाधारकांची मिळून ३०३ शस्रे तात्पुरत्या स्वरूपात जमा करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. यापैकी अद्याप २१० शस्रे पोलिसांकडे जमा झाली आहे. यामध्ये केवळ राजकीय छबी असलेल्या शस्र परवानाधारकांचा समावेश आहे. सर्वसामान्य परवानाधारकांची शस्रे जमा केली नसल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.
शहरात कोठेही कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या यादीवरील सराईत गुन्हेगारांची चाचपणी केली जात आहे. त्यानुसार सराईत गुन्हेगारांच्या टोळ्या हद्दपारदेखील करण्यात येत आहे. तसेच काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उपद्रवी लोकांना स्थानबद्धदेखील करण्यात येत आहे.
विधानसभा निवडणूक नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासून तर थेट निकालाच्या दिवसापर्यंतची शहरातील सर्व मतदान केंद्रे, पाच स्ट्रॉँग रूम, संवेदनशील मतदान केंद्रे, प्रचार फेऱ्या, प्रचारसभा याबाबत चोख बंदोबस्त व सुरक्षेच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले. बेकायदेशीरपणे शस्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आतापर्यंत उपद्रवी संशयित एक हजारांपेक्षा अधिक लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच सराईत गुन्हेगारांपैकी ९७ गुन्हेगारांना शहरासह जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. दहा ते बारा संशयितांवर झोपडपट्टी दादा कायद्यान्वये गुन्हे दाखल क रण्यात आले आहेत.
शस्रांबरोबरच ८४ लाखांची दारू जप्त
आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शहराच्या ग्रामीण भागातील सीमावर्ती नाक्यांवर कारवाई करीत आतापर्यंत सुमारे ८४ लाख रुपयांची दारू जप्त केली आहे. यामध्ये हजारो लिटर दारूचा समावेश आहे. मद्याचा अवैधसाठा हा कें द्रशासित प्रदेशांमध्ये निर्मित असून, त्याची विक्री राज्यात करण्याचा डाव भरारी पथकांनी उधळला. निवडणूक काळात अशाप्रकारच्या मद्याला मागणी वाढून तस्करीला वेग येतो. त्यामुळे सीमावर्ती नाक्यांसह भरारी पथक सक्रिय करण्यात आले आहे. सर्वाधिक कारवाई त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सुरगाणा तालुक्यांत करण्यात आली आहे.
४ शहर पोलिसांनी अद्यापपर्यंत ४ लाख ५८ हजार रूपयांची अवैधरित्या वाहतूक केली जाणारी रोकड जप्त केली आहे. तसेच मादक पदार्थांमध्ये ८६ लाख ८७८ किलो गांजा, १३८ लिटर दारू, ७ गावठी कट्टे, ११ जीवंत काडतुसे, ३ तलवार, १ चॉपर अशी शस्त्रेही जप्त करू न संबंधितांवर कारवाई केली आहे.

Web Title: १४ Illegal weapons seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.