मालेगावी १४ जणांची भर; १२७ बाधितांवर उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 11:42 PM2020-05-31T23:42:36+5:302020-05-31T23:42:55+5:30
रविवारी सायंकाळी पावणेसहा वाजता मिळालेल्या तपासणी अहवालात नव्याने १४ बाधित मिळून आल्याने शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७७९वर पोहोचली आहे. शनिवारपर्यंत त्यातील ६०४ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आता मालेगावात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या १२७ इतकी आहे.
मालेगाव : रविवारी सायंकाळी पावणेसहा वाजता मिळालेल्या तपासणी अहवालात नव्याने १४ बाधित मिळून आल्याने शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७७९वर पोहोचली आहे. शनिवारपर्यंत त्यातील ६०४ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आता मालेगावात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या १२७ इतकी आहे.
मालेगावी कोरोना बाधितांवर उपचार होऊन पूर्ण बरे झालेल्यांची संख्या वाढून उपचार घेणारे केवळ ८४ रुग्ण राहिले होते, मात्र गेल्या दोन ते तीन दिवसात मोठ्या संख्येने बाधित मिळून आल्याने उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या १२७ पर्यंत पोहोचली आहे. ग्रामीण भागात कोरोनाने हातपाय पसरल्याने ही संख्या वाढत चालली आहे. आता पावसाळा सुरू होत असल्याने युद्धपातळीवर प्रयत्न करून कोरोनाला रोखावे लागणार आहे.
आज सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास १४७ जणांचे तपासणी अहवाल मिळाले. त्यात ९७ निगेटिव्ह, तर १४ पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आले आहेत. आज मिळालेल्या बाधितांमध्ये कॅम्पातील ३० वर्षीय एसआरपीएफ जवान, गिलानकर नगरातील ४० वर्षीय पुरुष, आयेशानगर भागातील ३० वर्षीय तरुण, संगमेश्वरच्या खारकर वाड्यातील १४ आणि १५ वर्षांची दोन मुले, ४२ वर्षाची महिला, ७० वर्षांचा वृद्धाचा समावेश आहे. द्यानेतील शिवनगर भागातील ४५ वर्षीय पुरुष, नांदगावची ६२ वर्षीय महिला, मालेगावच्या कुरेशबाद मधील ४८ वर्षीय पुरुष, इजहार अश्रफनगरमधील ८ वर्षांचा मुलगा, सर सय्यदनगरमधील ३१ वर्षीय महिला, १४ आणि १० वर्षांची दोन मुले कोरोनाबाधित मिळून आले.