मालेगाव तालुक्यात १४ नामांकन अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 01:08 IST2020-12-24T23:07:09+5:302020-12-25T01:08:49+5:30
मालेगाव : ग्रामपंचायत निवडणुकीच्या नामांकन अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी ७ ग्रामपंचायतींमधून १४ नामांकन अर्ज दाखल झाले आहेत.

मालेगाव तालुक्यात १४ नामांकन अर्ज दाखल
ठळक मुद्देपहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता.
मालेगाव : ग्रामपंचायत निवडणुकीच्या नामांकन अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी ७ ग्रामपंचायतींमधून १४ नामांकन अर्ज दाखल झाले आहेत.
बुधवारपासून नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया येथील तहसील कार्यालयात सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता. गुरुवारी १४ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहे.
यात ग्रामपंचायतीचे नाव व दाखल झालेल्या अर्जांची संख्या अशी - नरडाणे, दसाणे, कौळाणे नि. प्रत्येकी १, तळवाडे, वडेल प्रत्येकी २, टेहरे ३, येसगाव बु।। ४ असे एकूण १४ अर्ज दाखल झाले आहेत. पुढील तीन दिवस शासकीय सुट्टी असल्याने शेवटच्या काही दिवसात अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ होणार आहे.