ओझरसह परिसरात १४ रुग्ण कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 00:42 IST2021-05-10T20:31:24+5:302021-05-11T00:42:29+5:30

ओझरटाऊनशिप : ओझरसह परिसरात गेल्या, अकरा दिवसापासुन कोरोना बाधित रुग्ण संख्येत घट होत आहे ही बाब ओझरकरासाठी दिलासाजनक असून सोमवारी १४ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत.

14 patients were found to be infected with corona | ओझरसह परिसरात १४ रुग्ण कोरोना बाधित

ओझरसह परिसरात १४ रुग्ण कोरोना बाधित

ठळक मुद्देकोरोना बाधित रुग्ण संख्या एकुण ४३७५ झाली आहे.

ओझरटाऊनशिप : ओझरसह परिसरात गेल्या, अकरा दिवसापासुन कोरोना बाधित रुग्ण संख्येत घट होत आहे ही बाब ओझरकरासाठी दिलासाजनक असून सोमवारी १४ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत.
ओझरसह परिसरातील जनता कर्फ्युमुळे कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. ओझरसह परिसरात सोमवारी (दि.१०) १४ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता ओझरसह परिसरातील कोरोना बाधित रुग्ण संख्या एकुण ४३७५ झाली आहे. पैकी १२७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. ४१२६ रुग्ण बरे झाले असुन १२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्या पैकी १५ रूग्णालयात असुन १०७ रुग्ण घरीच कॉरंटाईन होऊन उपचार घेत आहेत.

परिसरातील एकुण कंटेन्मेंट झोन संख्या २१५० झाली असुन १९९१ झोन पूर्ण झाले आहेत आता अँक्टिव्ह झोन १५९ आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
ओझर परिसरामध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याने नागरिकांनी या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घ्यावी तसेच होम क्वारंटाईन रुग्णांनी घरातच थांबावे बाहेर फिरू नये असे व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओझर सह परिसरातील नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे सर्वानी मास्क, सॅनिटाईझर, सोशल डिस्टशनिंगचा नियमित वापर करावा असे आवाहन आरोग्य विभागातर्फे आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली कदम, आरोग्य सहाय्यक अनिल राठी यांनी केले आहे.
ओझर परिसरामध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याने नागरिकांनी या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घ्यावी तसेच होम क्वारंटाईन रुग्णांनी घरातच थांबावे बाहेर फिरू नये असे व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओझर सह परिसरातील नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे सर्वानी मास्, सॅनिटाईझर, सोशल डिस्टशनिंगचा नियमित वापर करावा असे आवाहन आरोग्य विभागातर्फे केले आहे.

Web Title: 14 patients were found to be infected with corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.