जिल्ह्यात १४ जण आढळले कोरेानाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2022 01:51 AM2022-06-16T01:51:30+5:302022-06-16T01:52:21+5:30
गेल्या दोन दिवसाच्या तुलनेत बुधवारी जिल्ह्यात कोरेानाबाधितांची संख्या कमी असल्यामुळे दिलासा मिळाला आहे. सोमवारी बाधितांची संख्या २० तर मंगळवारी १६ इतकी संख्या होती.
नाशिक : गेल्या दोन दिवसाच्या तुलनेत बुधवारी जिल्ह्यात कोरेानाबाधितांची संख्या कमी असल्यामुळे दिलासा मिळाला आहे. सोमवारी बाधितांची संख्या २० तर मंगळवारी १६ इतकी संख्या होती. बुधवारी नाशिकमध्ये आढळलेल्या १४ रुग्णांपैकी ११ रुग्ण हे नाशिक महापालिका हद्दीतील आहेत, तर मालेगाव मनपा क्षेत्रात १, जिल्ह्यात इतरत्र २ रुग्ण आढळले आहेत. राज्यातील अनेक शहरांमध्ये बाधित रुग्ण आढळत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. मास्कची सक्ती केलेली नसली तरी मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून लसीकरणावर भर देण्यात आला असून, ज्यांचे दोन्ही डोस झालेले आहेत त्यांना बूस्टर डोस घेण्याचेही आवाहन केले जात आहे.