धोडंबेतील १४ व्यक्ती विलगीकरण कक्षात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 09:45 PM2020-06-02T21:45:13+5:302020-06-03T00:15:44+5:30
चांदवड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील धोडंबे गावामध्ये टिटवाळा ठाण्याहून आलेल्या १४ जणांना क्वॉरण्टाइन करण्यात आले.
चांदवड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील धोडंबे गावामध्ये टिटवाळा ठाण्याहून आलेल्या
१४ जणांना क्वॉरण्टाइन करण्यात आले.
संबंधितांना गावामध्ये प्रवेश देण्यात आला. तथापि, त्यांची माध्यमिक शाळेत व्यवस्था करण्यात आली. तहसीलदार प्रदीप पाटील यांनी सांगितले की, बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांना विलगीकरण करताना ग्रामसुरक्षा समिती स्थापन करण्यात आलेली आहे.
या ग्रामसुरक्षा समितीमध्ये सरपंच हे अध्यक्ष असतील व पोलीसपाटील हे सदस्य सचिव असतील, तर तलाठी, ग्रामसेवक व जिल्हा परिषद - माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक हे सदस्य असतील.
बाहेरगावावरून आलेल्या व्यक्तींचे विलगीकरण करणे व त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविणे, बाहेरगावाकडून आलेल्या व्यक्तीेंकडे परवानगी पत्र आहे की नाही याची तपासणी करणे,
पत्र नसेल अशा व्यक्तींना गावात प्रवेश देऊ नये, आरोग्य विभागामार्फत त्यांची तपासणी करून त्यांच्या हातावर
होम क्वॉरण्टाइनचा शिक्का मारून त्यांना व्यवस्था केलेल्या
ठिकाणी विलगीकरण करणे व कोविड - १९ची लक्षणे आढळल्यास केअर सेंटरला माहिती देण्याची जबाबदारी या समितीची राहील, असे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.