बाधितांच्या संपर्कातील १४ अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 09:36 PM2020-06-12T21:36:45+5:302020-06-13T00:13:40+5:30

सिन्नर : जामगाव, दोडी बुद्रुक येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर १८ निकटवर्तीयांच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. पैकी १४ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून, ते निगेटिव्ह आल्याने दोन्ही गावातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

14 reports of contact with victims are negative | बाधितांच्या संपर्कातील १४ अहवाल निगेटिव्ह

बाधितांच्या संपर्कातील १४ अहवाल निगेटिव्ह

googlenewsNext

सिन्नर : जामगाव, दोडी बुद्रुक येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर १८ निकटवर्तीयांच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. पैकी १४ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून, ते निगेटिव्ह आल्याने दोन्ही गावातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
दोडी बुद्रुक येथील रुग्णाचे सहा निकटवर्तीय निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे दोडीतील ग्रामस्थांना पूर्णत: दिलासा मिळाला. जामगावातील बाधित महिलेच्या संपर्कातील बारा जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. यातील काहींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
अजून काही अहवाल येणे बाकी आहे. तथापि प्राप्त झालेले अहवाल निगेटिव्ह आल्याने जामगाव येथील ग्रामस्थांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
-------------------
पाथरे खुर्दतील रुग्णाच्या संपर्कातील निगेटिव्ह
पाथरे खुर्द येथे ७६ वर्षीय वृद्ध कोरोना बाधित आढळून आला होता. त्याच्या संपर्कातील निकटवर्तीय निगेटिव्ह आले आहेत. खळवाडी, पाथरे खुर्द येथील नागरिक निगेटिव्ह आाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. शुक्रवारी ७ अहवाल प्राप्त झाले असून, ते सर्व निगेटिव्ह आहेत. तसेच १३ अहवाल आतापर्यंत प्रलंबित आहेत.

 

Web Title: 14 reports of contact with victims are negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक