९३ हजारांचे १४ स्मार्टफोन हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:11 AM2020-12-09T04:11:27+5:302020-12-09T04:11:27+5:30

रविवारी सायंकाळच्या सुमाराला पेठ फाटा येथे एक युवतीने मोबाइलवर संभाषण केल्यानंतर मोबाइल बॅगमध्ये ठेवला त्यानंतर पवारने बॅगमधून मोबाइल चोरी ...

14 smartphones worth Rs 93,000 seized | ९३ हजारांचे १४ स्मार्टफोन हस्तगत

९३ हजारांचे १४ स्मार्टफोन हस्तगत

Next

रविवारी सायंकाळच्या सुमाराला पेठ फाटा येथे एक युवतीने मोबाइलवर संभाषण केल्यानंतर मोबाइल बॅगमध्ये ठेवला त्यानंतर पवारने बॅगमधून मोबाइल चोरी करण्याचा प्रयत्न केला असता युवतीने आरडाओरड सुरू केली. त्याचवेळी पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी पोलीस हवालदार म्हणून गुंजाळ, संदीप गाडे, घनश्याम महाले आदी परिसरात थांबले असताना त्यांनी मोबाइल चोराचा पाठलाग करून त्याला पकडले त्यानंतर सदर युवतीला तक्रार देण्याबाबत पोलिसांनी सांगितले असता तिने आई-वडील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याने तक्रार देत नसल्याचे सांगितले.

मोबाइल चोरी करताना सापडलेल्या संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याची वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक अशोक भगत आणि सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांनी कसून चौकशी केली असता त्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून एक मोबाइल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याची अंग झडती घेतली असता त्यांच्याकडून ९३ हजार रुपये किमतीचे १४ मोबाइल आढळून आले.

Web Title: 14 smartphones worth Rs 93,000 seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.