वीज मीटर नसताना आले १४ हजाराचे बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 05:38 PM2018-12-05T17:38:51+5:302018-12-05T17:40:10+5:30
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील ग्राहकाचे घरगुती वीज मीटर कनेक्शन कट केले असताना वीज वितरण कंपनीने १४ हजार रूपयांचे वीज बील दिल्याने वीज वितरण कंपनीचा सावळा गोंधळ उजेडात आला आहे.
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील ग्राहकाचे घरगुती वीज मीटर कनेक्शन कट केले असताना वीज वितरण कंपनीने १४ हजार रूपयांचे वीज बील दिल्याने वीज वितरण कंपनीचा सावळा गोंधळ उजेडात आला आहे.
संबधीत ग्राहक पोपट नारायण बोडखे यांनी याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याकडे एका निवेदनाद्वारे तक्र ार केली असून वीज बील कमी न झाल्यास आत्मदहनाचा इशारा बोडके यांनी दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
मार्च २०१८ मध्ये येथील परिसरातील वायरमन यांनी बोडके यांचे घरगुती वीज मीटर बिलाअभावी काढून नेले होते. त्यानंतर सदर मीटर नगरसूल उपकेंद्रात जमा करण्यात आले. त्यावेळी बोडके यांचे ४५०० रूपयाचे थकीत वीज बिल होते. वीज बिल कट असताना १४ हजाराचे वीज बिल वीज वितरण कंपनीने दिल्याने पोपट बोडके हे बिल घेऊन वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयाकडे गेले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन वीज बिल भरावेच लागेल असे सांगण्यात आले. वीज मीटर नसताना एवढे बील आलेच कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे.