मनपाच्या कर्मचाऱ्यांना १४ हजारांचे सानुग्रह अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:38 AM2018-10-21T00:38:01+5:302018-10-21T00:38:57+5:30
नाशिक : महापालिकेच्या कर्मचाºयांना यंदा सानुग्रह अनुदान मिळणार की नाही ही शंका दूर झाली असून, तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या ...
नाशिक : महापालिकेच्या कर्मचाºयांना यंदा सानुग्रह अनुदान मिळणार की नाही ही शंका दूर झाली असून, तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाºयांना १४ हजार रुपयांची रक्कम देण्याचा निर्णय अखेरीस प्रशासनाने घेतला आहे. याचा लाभ अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मानधनावरील कर्मचाºयांना मिळणार आहे. मात्र केंद्र सरकारच्या एनयूएचएम अंतर्गत काम करणाºया कर्मचाºयांना त्याचा लाभ मिळणार नाही.
दिवाळीच्या तोंडावर सानुग्रह अनुदानाकडे आस लावलेल्या ५ हजार ४८८ कर्मचाºयांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. यंदा प्रथम आणि द्वितीय श्रेणीच्या अधिकाºयांना वगळण्यात आले आहे.
गेल्या महिनाभरापासून महापालिका वर्तुळात सानुग्रह अनुदानाचा विषय चर्चेत होता. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यंदा सानुग्रह अनुदानाच्या संदर्भात नकारात्मक भूमिका घेतल्याने कर्मचारी आणि नगरसेवक यांच्यात नाराजी व्यक्त केली जात होती. महासभेने गेल्याच महिन्यात सर्व कर्मचाºयांना सानुग्रह अनुदान देण्याचा ठराव महासभेत केला आणि तो आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे पाठविला होता. परंतु दरवर्षीप्रमाणे त्यांनी कर्मचारी संघटना आणि पदाधिकाºयांशी चर्चा केली नाहीच उलट आयुक्त सानुग्रह अनुदान देण्यास प्रतिकूल असल्याची चर्चा असल्याने कर्मचाºयांमध्ये उत्सुकता होती.