कोणतेही खाद्यतेल १४० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 01:18 AM2020-12-28T01:18:58+5:302020-12-28T01:20:35+5:30

अर्जेंटिना, युक्रेनमध्ये सुरू असलेला संप, चीनने वाढविलेली खरेदी आदी कारणांमुळे देशभरात विविध कंपन्यांच्या खाद्यतेलाची टंचाई निर्माण झाली आहे. मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाल्याने खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले असून बहुतेक सर्वच कंपन्यांच्या खाद्यतेलाचे दर १४० रुपये किलोपर्यंत गेले आहेत.

140 per kg of any edible oil | कोणतेही खाद्यतेल १४० रुपये किलो

कोणतेही खाद्यतेल १४० रुपये किलो

Next
ठळक मुद्देदेशभरात तुटवडा  : तांदूळही किलोमागे दहा रुपयांनी महागला

नाशिक : अर्जेंटिना, युक्रेनमध्ये सुरू असलेला संप, चीनने वाढविलेली खरेदी आदी कारणांमुळे देशभरात विविध कंपन्यांच्या खाद्यतेलाची टंचाई निर्माण झाली आहे. मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाल्याने खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले असून बहुतेक सर्वच कंपन्यांच्या खाद्यतेलाचे दर १४० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. खाद्यतेलाच्या किमती अजूनही वाढण्याचा अंदाज किराणा बाजारात व्यक्त केला जात आहे. दरम्यान नवीन तांदळाची आवक सुरू झाली असून तांदळाच्या दरात यावर्षी मागील वर्षीपेक्षा किलोमागे दहा रुपयांनी वाढ झाली आहे. पालेभाज्या आणि फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत.
यावर्षी देशभरात सोयाबीनला फटका बसल्याने सोयाबीनची टंचाई निर्माण झाली आहे. जगभरातील तेलबिया उत्पादक देशांमध्येही मालाचे उत्पादन कमी असल्यामुळे तेलाचे उत्पादन घटले आहे. यावर्षी चीन अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात सनफ्लॉवर तेल खरेदी करत आहे. इतरही पाश्चिमात्य देशांनी खाद्यतेलाची खरेदी वाढविली आहे. परिणामी, देशभरात खाद्यतेलाचा तुटवडा जाणवू लागला आहे. किराणा बाजारात इतर किराणामालाचे भाव स्थिर आहेत. नाशिक बाजार समितीमध्ये कांदापात वगळता कोणत्याही पालेभाजीला फारसा दर मिळत नाही. 

Web Title: 140 per kg of any edible oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.