भोसलाच्या १४०० विद्यार्थ्यांनी दिली पथसंचलनाद्वारे मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 01:02 AM2018-07-27T01:02:15+5:302018-07-27T01:03:40+5:30
नाशिक : कारगील विजयदिनानिमित्त भोसलाच्या १४०० विद्यार्थ्यांनी गुरुवारी (दि.२६) पथसंचलन करून शहिदांना मानवंदना दिली. यात मिलिटरी स्कूलचे ५५० विद्यार्थी, भोसला मिलिटरी स्कूल गर्ल्सच्या २८० विद्यार्थिनी,भोसला मिलिटरी कॉलेज १८० विद्यार्थी, रामदंडी सैनिकी प्रशिक्षणातील शाळांचे ४०० विद्यार्थी शहरातील तीन ठिकाणांहून निघालेल्या पथ संचलनात सहभागी झाले होते. यात १३ जणांचे अश्वपथक आणि ७५ विद्यार्थ्यांचा वाद्यवृंद यांचाही समावेश होता.

ग्रुप कॅप्टन विनायक देवधर यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राउंड येथे पुष्पचक्र अर्पण करून पहिले संचलन पोलीस परेड ग्राउंडपासून पोलीस परेड मैदान-कॉलेज रोड-भोसला मिलिटरी स्कूल येथील शहीद स्मारक या मार्गाने आले. या ठिकाणी सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह हेमंत देशपांडे आणि भोसला मिलिटरी स्कूलचे अधयक्ष अनिरु द्ध तेलंग हे उपस्थित होते. प्रिन्सिपल टी. ए. कुलकर्णी सर्कल येथे मानवंदना देण्यात आली. या ठिकाणी संस्थेचे सहकार्यवाह नितीन गर्गे, नरेंद्र वाणी उपस्थित होते. भोसला मिलिटरी कॉलेजचे विद्यार्थ्यांचा सहभाग असलेले दुसरे संचलन श्रीगुरु जी रु ग्णालयाचे सतीश पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर प्रमोद महाजन उद्यान-जेहान सर्कल विद्या प्रबोधिनी प्रशाला-भोसला मिलिटरी स्कूल शहीद स्मारक या मार्गाने आले. गंगापूररोड पोलीस शहीद स्मारक येथे संस्थेचे नाशिक विभागाचे कोषप्रमुख शीतल देशपांडे, प्रशांत नाईक यांनी मानवंदना दिली.
भोसला मिलिटरी स्कूलचे संचलन कॉलेज रोडवरील प्राचार्य टी .ए. कुलकर्णी चौकात, भोसला मिलिटरी कॉलेजचे संचलन गंगापूर रोडवरील पोलीस हुतात्मा स्मारक व भोसला मिलिटरी स्कूल गर्ल्सच्या प्रतिनिधींनी पारिजातनगर बसस्थानक चौकात अभिवादन केले. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त, पदाधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.मिलिटरी स्कूल गर्ल्सच्या विद्यार्थिनींचा सहभागभोसला मिलिटरी स्कूल गर्ल्सच्या विद्यार्थिनींचा सहभाग असलेले तिसरे संचलन संस्थेच्या सदस्या रश्मी रानडे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर त्र्यंबक रोडवरील माजी सैनिकांच्या मुलांच्या वसतिगृहापासून असून त्र्यंबक रोड, एबीबी सर्कल, महात्मानगर, समर्थनगर ते भोसला मिलिटरी स्कूल शहीद स्मारकापर्यंत आले. या ठिकाणी तिन्ही पथसंचलनाने भोसला मिलिटरी स्कूलमधील शहीद स्मारकास मानवंदना अर्पण केली. याठिकाणी सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर यांनी मानवंदना दिली.