१४ हजार रोहित्रे बंद; ३५४ वाहिन्या नादुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:16 AM2021-05-18T04:16:27+5:302021-05-18T04:16:27+5:30

नाशिक : चक्रीवादळाच्या प्रभावामुळे नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज वाहिन्या व विद्युत यंत्रणेचे नुकसान झाले असून ...

14,000 Rohitras closed; 354 channels incorrect | १४ हजार रोहित्रे बंद; ३५४ वाहिन्या नादुरुस्त

१४ हजार रोहित्रे बंद; ३५४ वाहिन्या नादुरुस्त

Next

नाशिक : चक्रीवादळाच्या प्रभावामुळे नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज वाहिन्या व विद्युत यंत्रणेचे नुकसान झाले असून अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला. शहरात देखील दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. दरम्यान, वाऱ्याची तीव्रता कमी होताच महाविरणकडून दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली. सायंकाळी अनेक भागातील वीज पुरवठा सुरळीत सुरू झाला होता. जोरदार वाऱ्यामुळे जिल्ह्यात ४० वीज उपकेंद्रे प्रभावित झाली होती. त्यापैकी २७ उपकेंद्रे सुरू करण्यात आली. ३५४ वीज वाहिन्या बंद पडल्या. त्यापैकी १७१ सुरू झाल्या आहेत. १४,०६३ रोहित्रे बंद झाली होती, त्यापैकी ७,३१३ रोहित्रे सुरू करण्यात आली. उच्च व लघुदाबाचे एकूण १६३ खांब प्रभावित झाले, त्यापैकी ६७ सुरळीत करण्यात आले. उर्वरित बंद असलेली यंत्रणासुद्धा पूर्ववत करण्याचे कार्य युद्धस्तरावर सुरू आहे. वृत्त लिहिस्तोवर उर्वरित बंद असलेला बहुतांश भाग सुरू करण्यात आला होता.

उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे वीज वाहक यंत्रणेवर बसविण्यात आलेल्या पिन इन्सुलेटर आणि डिस्क इन्सुलेटरवर पावसाचे पाणी पडल्याने ते पंक्चर होऊन वीजपुरवठा बाधित झाला आहे. याशिवाय झाडाच्या फांद्या वीजवा हक तारांवर पडल्याने व वाऱ्यामुळे तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला.

नाशिक ग्रामीण तसेच शहरातही वादळामुळे वीज यंत्रणेला फटका बसला, वीज यंत्रणेवर झाडे व फांद्या कोसळल्याने अनेक वीज वाहिन्यांचा पुरवठा बंद पडला. अनेक वीज वाहिन्यांचा वीज पुरवठा सुरक्षिततेच्या कारणासाठी बंद ठेवण्यात आला होता. चक्रीवादळामुळे महावितरणच्या यंत्रणेचे नुकसान झाले असून हे चक्रीवादळ राज्यात घोंघावत असून या वादळाचा सामना करण्यास महावितरणची यंत्रणा सज्ज झाली आहे. नैसर्गिक आपत्तीपासून होणारे नुकसान हे वादळाच्या तीव्रतेवर अवलंबून असून प्रभावित भागांचा विद्युत पुरवठा पूर्ववत केला जाणार आहे.

--इन्फो--

आपत्कालीन यंत्रणा सज्ज

आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी २४ तास सुरू असणारे टोल फ्री क्रमांक १९१२, १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या तसेच नाशिक येथील नियंत्रण कक्षाचे ७८७५३५७८६१ आणि ७८७५७६६३५१ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय आपल्या क्षेत्रातील महावितरणचे कक्ष कार्यालय व अभियंता यांना संपर्क करावा, असेही आवाहन महावितरणने केले आहे.

फोटो ओळ: अंबड येथे ३३ केव्ही वाहिनीवर झाड कोसळल्याने वीज पुरवठा बंद पडला.

Web Title: 14,000 Rohitras closed; 354 channels incorrect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.