१४३ अंगणवाड्या बंद होणारच! शिष्टमंडळाला टोलवले : सेविका-मदतनिसांचा भ्रमनिरास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:55 AM2018-05-09T00:55:01+5:302018-05-09T00:55:01+5:30
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कमी पटसंख्येमुळे १४३ अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याला विरोध दर्शविण्यासाठी भारतीय हितरक्षक सभेच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे शिष्टमंडळ आयुक्तांच्या भेटीला गेले असता, आयुक्तांनी कोणत्याही स्थितीत १४३ अंगणवाड्या बंद होणारच, असा पवित्रा घेत संबंधित सेविका व मदतनिसांनाही त्यांची मुदत संपल्यानंतर घरी पाठविणार असल्याचे स्पष्ट केल्याची माहिती संस्थेचे सभानायक किरण मोहिते यांनी दिली.
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कमी पटसंख्येमुळे १४३ अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याला विरोध दर्शविण्यासाठी भारतीय हितरक्षक सभेच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे शिष्टमंडळ आयुक्तांच्या भेटीला गेले असता, आयुक्तांनी कोणत्याही स्थितीत १४३ अंगणवाड्या बंद होणारच, असा पवित्रा घेत संबंधित सेविका व मदतनिसांनाही त्यांची मुदत संपल्यानंतर घरी पाठविणार असल्याचे स्पष्ट केल्याची माहिती संस्थेचे सभानायक किरण मोहिते यांनी दिली. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे आता महासभेत सदर प्रस्तावाला मंजुरी देऊ नये यासाठी सर्वपक्षीय आमदारांसह नगरसेवकांना साकडे घातले जाणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले आहे. आयुक्तांनी महापालिकेच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या अंगणवाड्यांच्या सर्वेक्षणानंतर सुमारे १४३ अंगणवाड्या कमी पटसंख्येमुळे बंद करण्याचा आणि तेथील विद्यार्थी लगतच एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत चालविल्या जाणाºया अंगणवाड्यांमध्ये स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. सदरचा प्रस्ताव येत्या महासभेवर ठेवला जाण्याची शक्यता आहे. आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी भारतीय हितरक्षक सभेचे सभानायक किरण मोहिते यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर केले.