१४ रोजी व्हॅलेंटाईन डे, कॉलेज उघडणार १५ तारखेनंतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:13 AM2021-02-08T04:13:33+5:302021-02-08T04:13:33+5:30
नााशिक : फेब्रुवारी महिन्यातील १४ तारखेला‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा होणार आहे. प्रेमभावना व्यक्त करण्याच्या या दिवसाचे कॉलेज तरुण-तरुणींच्या जीवनात विशेष ...
नााशिक : फेब्रुवारी महिन्यातील १४ तारखेला‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा होणार आहे. प्रेमभावना व्यक्त करण्याच्या या दिवसाचे कॉलेज तरुण-तरुणींच्या जीवनात विशेष स्थान असते. नव्याने नाती जोडणारा आणि असलेली नाती जपणारा असा हा दिवस. प्रेमाचा हा दिवस १४ तारखेला साजरा होत असताना महाविद्यालये मात्र १५ तारखेनंतर उघडली जाणार आहेत. त्यामुळे महाविद्यालये उघडताच पहिला दिवस प्रेमाचा ठरणार आहे.
कोरेानामुळे शाळा, महाविद्यालयांवरील निर्बंध आता उठविले जात आहेत. शाळा सुरू झाल्या आहेत तर अकरावी, बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. वरिष्ठ महाविद्यालयांना १५ तारखेची वाट पाहावी लागणार आहे. अकरावी, बारावीचे बहुतेक वर्ग माध्यमिक शाळांना जोडलेले असल्याने तेथे अभावानेच व्हॅलेंटाईन साजरा होऊ शकतो. परंतु ज्युनिअर, सीनिअर महाविद्यालयांमध्ये प्रेमाच्या दिवसानेच विद्यार्थ्यांचे स्वागत होणार आहे.
खरे तर व्हॅलेंटाईनचा एक दिवस नव्हे तर अवघा आठवड्याभर व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. महाविद्यालये सुरू असतांना प्रत्येक दिवशी एक वेगळा दिवस तरुणाईकडून साजरा केला जातो. रविवारी रोज डे पासून या व्हॅलेंटाईन दिनाला सुरुवात झाली. येत्या २१ तारखेपर्यंत विविध विषयांवर तरुण-तरुणी आपले प्रेम व्यक्त करणारे दिवस साजरे करणार आहेत. एकमेकांबद्दल असलेला आदरभाव आणि विश्वासाचे नाते निर्माण करणारे वैशिष्ट्यपूर्ण दिवस या सप्ताहात नियोजित केले जातात.
दरवर्षी महाविद्यालयांमध्ये यानिमित्ताने धम्माल मजामस्ती केली जाते. मित्र-मैत्रिणी या दिवसाचा आनंद लुटतात. व्हॅलेंटाईन वीकमध्ये महाविद्यालये सुरू होत असल्याने काही दिवस चुकणार असले तरी तरुणाईने उत्साहाचे प्लॅनिंग आताच केले असणार.