१५ सफाई कामगारांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 11:17 PM2018-12-02T23:17:35+5:302018-12-02T23:19:14+5:30
त्र्यंबकेश्वर : कामावरून कमी केल्याने संतापत्र्यंबकेश्वर : आपल्या विविध मागण्यांसाठी तसेच नगरपरिषदेच्या १५ सफाई कामगारांनाच कामावरून कमी केल्याच्या विरोधात सर्व कामगारांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
त्र्यंबकेश्वर : कामावरून कमी केल्याने संतापत्र्यंबकेश्वर : आपल्या विविध मागण्यांसाठी तसेच नगरपरिषदेच्या १५ सफाई कामगारांनाच कामावरून कमी केल्याच्या विरोधात सर्व कामगारांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत सन १९९२ पासून काम करीत आहोत. आम्हाला कामावरून कमी केल्याच्या विरोधात रविवार (दि.२)पासून आमरण उपोषणास बसलो आहोत, असे कामगारांनी स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनदेखील संबंधितांना देण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रती नगरपालिकेचे मुख्य अधिकारी, जिल्हाधिकारी व कामगार आयुक्त यांना पाठविल्या आहेत. कमी केलेल्या कामगारांना कामावर घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेमध्ये शहरातीलच स्थानिक लोक कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहे. सन १९९२ पासून रोजंदारी पद्धतीने काम करत होते; परंतु २००६ साली प्रशासनाने कामगारांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांना ठेकेदाराकडे वर्ग केले. मात्र आजही त्यांना नगरपालिका कर्मचारी म्हणून ओळखले जाते. आज ना उद्या आपल्याला कायम करण्यात येईल या आशेवर गेली २७ वर्षांपासून हे कामगार काम करत होते. मात्र २० आॅक्टोबर रोजी कोणतेही कारण न देता सर्र्वांचे काम बंद केले. यामुळे कामगारांसह कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. याविरोधात उपोषणाचा निर्णय घेतला असल्याचे निवेदनात म्हटले होते. निवेदनावर नानासाहेब दोंदे, लक्ष्मण फूलमाळी, राम दोंदे, प्रकाश दोंदे, भिका गायकवाड, सुमन दोंदे, मीना कदम, योगीता दोंदे, सोनाली दोंदे, राजू गाडे, रोहित सोळंकी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.कामगारांना नियमबाह्य पद्धतीने कामावरून कमी केले आहे. गेली अनेक वर्षे नगरपालिकेत सफाई कामगार म्हणून हे कामगार काम करतात. पालिकेत ठेकेदारी पद्धत नव्हती तेव्हापासून ते कामे करतात. त्यांच्या न्याय्यहक्कासाठी त्यांच्या मागण्यांबाबत पालिकेने सहानुभूतीने लक्ष द्यावे व त्यांना कामावर हजर करु न घ्यावे, असे मी पालिकेस आवाहन करीत आहे
- धनंजय तुंगार
माजी नगराध्यक्ष , त्र्यंबकेश्वर नगरपरिषद