रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात १५ टक्के घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:14 AM2021-04-04T04:14:32+5:302021-04-04T04:14:32+5:30

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात भर पडत असताना कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही सातत्याने घसरण होत आहे. फेब्रुवारी महिन्यात ...

15% drop in patient recovery rate | रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात १५ टक्के घसरण

रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात १५ टक्के घसरण

Next

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात भर पडत असताना कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही सातत्याने घसरण होत आहे. फेब्रुवारी महिन्यात ९८ टक्क्यांवर असलेले कोरोनामुक्ततेचे प्रमाण मार्च महिन्याच्या अखेरीस १५ टक्क्यांनी घसरून ८३ टक्क्यांपर्यंत खाली पोहोचले आहे.

नाशिक जिल्ह्यात बाधित झालेल्या पावणेदोन लाख कोरोनाबाधितांपैकी १ लाख ८९ हजार ३०१ कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत २८ हजार २३१रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत २ हजार ४२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक ५८४, चांदवड १ हजार ४०, दिंडोरी ५१९, निफाड १ हजार ६७०, देवळा ८७१, नांदगाव ५१५, येवला ३६४, त्र्यंबकेश्वर १६८, सुरगाणा १५२, पेठ ६१, कळवण ४१५, बागलाण १ हजार ८३, इगतपुरी ३७१, मालेगाव ग्रामीण ८३१ अशा एकूण ९ हजार २१७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १५ हजार २३३, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ५९५, तर जिल्ह्याबाहेरील २१४ असे एकूण २५ हजार १९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ७४ हजार ६८२ रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात नाशिक ग्रामीणला ९५१, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १६ हजार ९२७, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ८७९ व जिल्ह्याबाहेरील २०८ अशा एकूण २८ हजार २३१ रुग्णांवर उपचार सुरू असून २ हजार ४२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

इन्फो

कोरोनामुक्तची टक्केवारी

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये ८२.७१ टक्के, नाशिक शहरात ८४.७८ टक्के, मालेगावमध्ये ७६.६५ टक्के, तर जिल्हाबाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८८.७४ टक्के आहे. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.८१ इतके आहे. एका महिन्यात कोरोनामुक्तच्या प्रमाणात तब्बल १५ टक्के घसरण झाल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने तो अधिक चिंतेचा विषय ठरला आहे.

Web Title: 15% drop in patient recovery rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.