जिल्हा परिषदेत निघाला १५ पोते कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 01:14 AM2018-09-16T01:14:11+5:302018-09-16T01:14:19+5:30

संपूर्ण जिल्ह्णातील ग्रामीण भागातील आरोग्याची व स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषदेत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या शुभारंभानिमित्ताने राबविण्यात आलेल्या श्रमदान मोहिमेत जिल्हा परिषदेच्या आवारात तब्बल १५ पोते कचरा जमा करण्यात आला. त्यामुळे जिल्हाभरात अभियान राबविणाऱ्या जिल्हा परिषदेतच आतापर्यंत साचलेल्या कचºयाचे वास्तव शनिवारी (दि.१५) समोर आले आहे.

15 grandchildren left for Zilla Parishad | जिल्हा परिषदेत निघाला १५ पोते कचरा

जिल्हा परिषदेत निघाला १५ पोते कचरा

Next
ठळक मुद्दे‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या पहिल्याच दिवशी वास्तवाचे दर्शन

नामदेव भोर । लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : संपूर्ण जिल्ह्णातील ग्रामीण भागातील आरोग्याची व स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषदेत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या शुभारंभानिमित्ताने राबविण्यात आलेल्या श्रमदान मोहिमेत जिल्हा परिषदेच्या आवारात तब्बल १५ पोते कचरा जमा करण्यात आला. त्यामुळे जिल्हाभरात अभियान राबविणाऱ्या जिल्हा परिषदेतच आतापर्यंत साचलेल्या कचºयाचे वास्तव शनिवारी (दि.१५) समोर आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेत सहभागी होत अभियानाचा शुभारंभ केला. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्यासह सर्व खातेप्रमुख व कर्मचाºयांनी या मोहिमेत सक्रिय सहभागी होत स्वच्छता केली. या मोहिमेत तब्बल १५ पोते कचरा निघाला. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्णाच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषदेतच रोजच्या रोज स्वच्छता होत नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांसह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी आणि अन्य विभागाचेही अधिकारी जिल्हा परिषदेत रोज येताना त्यांचे या कचºयाकडे कधी लक्षच गेले नाही का असाही प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विविध ठिकाणी भेट देऊन तेथील स्वच्छता आणि आरोग्य सुविधांचा नियमित आढावा घेत असताना त्यांच्या नजरेतून रोजच्या कामाचे ठिकाण असलेली जिल्हा परिषदेची इमारत कशी चुकली? की जिल्हा परिषदेच्या स्वच्छतेप्रमाणेच जिल्ह्णातील आरोग्यसेवेकडेही केवळ स्वच्छता अभियान आणि छायाचित्रण उत्सवांपुरतेच पाहिले जाते असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहे.
आरोग्याचा धोका टळला
जिल्हा परिषद इमारतीच्या आवारात साचलेल्या कचºयामुळे डासांची उत्पत्ती होऊन येथे कार्यरत कर्मचारी, अधिकारी आणि पदाधिकाºयांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता. परंतु, सुदैवाने पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छता ही अभियान’मुळे जिल्हा परिषदेच्या इमारतीची स्वच्छता झाल्याने जनतेच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी, अधिकारी आणि पदाधिकाºयांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच टळला आहे.

Web Title: 15 grandchildren left for Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.