पिंपळगाव बसवंत येथून १५ किलो सोने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 01:09 AM2017-09-23T01:09:11+5:302017-09-23T01:09:35+5:30
येथील भरवस्तीतील सराफाच्या दुकानाचे कुलूप तोडून गुरुवारी (दि. २१) रात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करीत दुकानातील तिजोरी बनावट चावीने उघडून सुमारे १५ किलो सोने चोरून नेले. या सोन्याची किंमत सुमारे चार कोटी रुपये होते. याप्रकरणी पोलिसांनी १४ जणांना ताब्यात घेतले असून, सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
पिंपळगाव बसवंत : येथील भरवस्तीतील सराफाच्या दुकानाचे कुलूप तोडून गुरुवारी (दि. २१) रात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करीत दुकानातील तिजोरी बनावट चावीने उघडून सुमारे १५ किलो सोने चोरून नेले. या सोन्याची किंमत सुमारे चार कोटी रुपये होते. याप्रकरणी पोलिसांनी १४ जणांना ताब्यात घेतले असून, सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मुंबई - आग्रा महामार्गावर अशोक चोपडा यांचे श्रीनिवास ज्वेलर्स हे शोरूम आहे सदर दुकान हे दुमजली असून, वरील मजल्यावर मालक स्वत: राहतात. गुरुवारी रात्री चोरट्यांनी दरवाजा तोडून दुकानात प्रवेश केला व लॉकर बनावट चावीने उघडले. त्यांनी लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. सकाळी दुकान उघडण्यासाठी कामगार आले असता चोरी झाल्याचे उघडकीस आले. चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तेथे धाव घेतली. त्यानंतर श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. त्याने दुकानाच्या मागेपर्यंत माग दाखविला. पोलीस अधीक्षक संजय दराडे, उपअधीक्षक अतुल झेंडे यांनी येऊन पहाणी केली. तसेच तपासाबाबत सूचना दिल्या.