फ्लॅटचे आमिष दाखवून दीड लाखाची फसवणूक

By Admin | Published: January 8, 2015 12:43 AM2015-01-08T00:43:41+5:302015-01-08T00:44:20+5:30

फ्लॅटचे आमिष दाखवून दीड लाखाची फसवणूक

1.5 lakh fraud by showing flats bait | फ्लॅटचे आमिष दाखवून दीड लाखाची फसवणूक

फ्लॅटचे आमिष दाखवून दीड लाखाची फसवणूक

googlenewsNext

नाशिक : कन्स्ट्रक्शन कंपनीचे एजंट असल्याचे सांगून दीड लाखाची गुंतवणूक केल्यास इंदिरानगर परिसरात फ्लॅट तसेच दरमहा आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून दोघा संशयितांनी एकाची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़
विलास वसंतराव देशमुख (रा. कमोदनगर) यांना दोघा संशयितांनी आम्ही मुंबई येथील हिम्बस कन्स्ट्रक्शन कंपनीचे एजंट म्हणून काम करीत असल्याचे सांगितले़ तसेच कंपनीत दीड लाख रुपये गुंतविल्यास इंदिरानगर परिसरात एक फ्लॅट मिळेल व पुढील तीन वर्षांकरिता दरमहा पंधरा हजार रुपये परतावा मिळेल. त्यापैकी दहा हजार फ्लॅटचा हप्ता भरून घेण्यात येईल व दीड हजार रुपये कपात करण्यात येईल व साडेतीन हजारांचा चेक मिळेल, तसेच गुंतविलेल्या दीड लाख रुपयांवर सुरक्षा म्हणून पाच लाखांची क्रेडिट नोट अदा करण्याची योजना सांगून दीड लाख रुपये घेतले़ मात्र देशमुख यांना कोणताही परतावा न दिल्याने त्यांनी या संशयितांविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: 1.5 lakh fraud by showing flats bait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.