घरबसल्या पैसे कमिविण्याचे आमिष दाखवून महिलेला १५ लाखांचा गंडा
By नामदेव भोर | Published: July 6, 2023 04:48 PM2023-07-06T16:48:56+5:302023-07-06T16:49:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : घरातच बसून अधिक पैसे कमविण्याचे आमिष दाखवून २५ एप्रिल ते १७ मे २०२३ या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : घरातच बसून अधिक पैसे कमविण्याचे आमिष दाखवून २५ एप्रिल ते १७ मे २०२३ या कालावधीत एका सायबर भामट्याने एका महिलेला तब्बल १५ लाखांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाच महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसानी अज्ञात सायबर भामट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅनडा कॉर्नर भागातील ४४ वर्षाच्या महिलेची सायबर भामट्यांनी घरबसल्या जादा पैसे कमविण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे. भामट्याने महिलेला ९५४१०५०७८८ व्हॉट्सॲप क्रमांकावरून फोन करून महिलेला घर बसल्या जादा पैस कमिविण्याचे आमिष दाखविले, वेगवेगळ्या टेलिग्राम चॅनलवरून रोजगार मिळवून देण्याच्या निमित्ताने ओळख वाढवून वेगवेगळ्या बँक खात्यांवर सुरुवातीला १० लाख १९०० रुपये तसेच युपीआयद्वारे ५ लाख ६ हजार ९६१ रुपये अशी एकूण १५ लाख ८ हजार ८६१ रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने ऑनलाईन पैसे देवूनही अनेक दिवस होऊनही पैसे कमविण्याचे कोणतेही साधन उपलब्ध न झाल्याने अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने महिलने सायबर पोलिस ठाणे गाठत घडलेला प्रकार पोलिसांना सांगित ऑनलाईन भामट्याविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.