१५ माकडांना डोंगरावर जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 01:55 AM2019-06-04T01:55:36+5:302019-06-04T01:56:06+5:30

वैशाख वणव्याने पृथ्वीची काहिली होत असताना त्याचा फटका मानवासह पशुपक्ष्यांनाही बसत आहे. डोंगरदऱ्यात रानमेव्यावर गुजराण करणाºया माकडांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तहानेने व्याकूळ झालेल्या १५ माकडांना पिण्याच्या पाण्यासाठी आडवाडीच्या आडूआई डोंगरावरील ऐतिहासिक खोल हौदात उतरण्याची वेळ आली.

 15 monkeys on water on the mountains | १५ माकडांना डोंगरावर जलसमाधी

१५ माकडांना डोंगरावर जलसमाधी

Next

सिन्नर : वैशाख वणव्याने पृथ्वीची काहिली होत असताना त्याचा फटका मानवासह पशुपक्ष्यांनाही बसत आहे. डोंगरदऱ्यात रानमेव्यावर गुजराण करणाºया माकडांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तहानेने व्याकूळ झालेल्या १५ माकडांना पिण्याच्या पाण्यासाठी आडवाडीच्या आडूआई डोंगरावरील ऐतिहासिक खोल हौदात उतरण्याची वेळ आली. दुर्दैवाने त्यांना हौदातून बाहेर निघता न आल्याने त्यांना जलसमाधी मिळाली. पाण्यासाठी १५ माकडांवर जीव गमविण्याची वेळ आली. दुष्काळाने होरपळलेल्या सिन्नर तालुक्यात पाणीटंचाईने १५ माकडांचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना आहे. या भागातील पाणवठे आटल्याने माकडांना पाणी पिण्यासाठी अन्य पर्याय नव्हता. त्यामुळे या ऐतिहासिक हौदात पाणी पिण्यासाठी ही माकडे गेली असावीत, असा अंदाज आहे. पाणी पिण्यासाठी हौदात उतरल्यानंतर त्यांना बाहेर पडता न आल्याने त्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.
सोनांबे ग्रामपंचायतीचे सदस्य जर्नादन पवार हे मित्रासोबत रविवारी डोंगरावर मंदिरात गेल्यानंतर त्यांना हौदात लहान-मोठी १५ माकडे मृत्यूमुखी पडल्याचे दिसले. सर्व माकडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता व दुर्गंधी सुटली होती. त्यामुळे पवार यांनी सोमवारी सिन्नरच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात येऊन या घटनेची माहिती दिली. यावर्षी कधी नव्हे इतक्या टंचाईच्या झळा सिन्नर तालुक्याला बसत आहे. पूर्व भागात नेहमीच याचा फटका बसतो. मात्र यावर्षी पश्चिम पट्टयातही टंचाईचा फटका बसला असून त्यात १५ माकडांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



कोट‘
आडूआई डोंगरावर मित्रासह फिरण्यासाठी गेलो होते. तेव्हा सदर प्रकार निदर्शनास आला. याठिकाणी हौदात पायºया करणे गरजेचे आहे. तसे पत्र आपण वनविभागाला दिले आहे. शासनाने याची दखल न घेतल्यास भविष्यात आणखी वन्यप्राण्यांचा यात जीव जावू शकतो. शासनाने या हौदात दगडी पायºया न केल्यास स्वखर्चाने आपण याठिकाणी पायºया बसवणार आहोत. जनार्दन पवार, ग्रामपंचायत सदस्य, सोनांबे

बारा फुट खोल हौदाला पायºयाच नाहीत...
तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सोनांबे-कोनांबे शिवारात आडवाडीजवळ आडूआईचा डोंगर आहे. या डोंगरावर देवीचे मंदिर असून, आणखी वर गेल्यानंतर १० ते १२ जुने ऐतिहासिक दगडी हौद आहे. या डोंगर परिसरात माकडांचा वावर असतो. या ऐतिहासिक हौदामधील पाणी पूर्णपणे आटून गेले असून, केवळ एका हौदात तीन ते चार फूट पाणी आहे. सुमारे १२ फूट खोल असलेल्या हौदाला वर येण्यासाठी पायºया नाहीत.
आडूआईच्या डोंगरावर माकडांचा मृत्यू झाल्याचे समजते. वनकर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले आहे. याठिकाणी रेंज नसल्याने नेमका काय प्रकार घडला हे कर्मचारी आल्यानंतर समजेल.
- प्रवीण सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सिन्नर

Web Title:  15 monkeys on water on the mountains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.