नाशिकमधून मुंबईत पोहोचतोय १५ गाड्या भाजीपाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:15 AM2021-05-19T04:15:16+5:302021-05-19T04:15:16+5:30
चौकट- शेतकरी गटाकडून सोसायट्यांना पुरवठा नाशिकमधील ज्या शेतकरी बचत गटांचा भाजीपाल्याचा दररोजचा व्यवसाय आहे, त्यांचा लॉकडाऊनच्या काळातही व्यावसाय सुरू ...
चौकट-
शेतकरी गटाकडून सोसायट्यांना पुरवठा
नाशिकमधील ज्या शेतकरी बचत गटांचा भाजीपाल्याचा दररोजचा व्यवसाय आहे, त्यांचा लॉकडाऊनच्या काळातही व्यावसाय सुरू असून या गटांमार्फत थेट मुंबईतील सोसायट्यांमध्ये भाजीपाला पुरविला जात आहे. नाशिक येथील ओमसाईराम शेतकरी भाजीपाला गटातर्फे दररोज सुमारे दोन टन माल मुंबईतील सोसायट्यांमध्ये पाठविला जात आहे.
कोट-
शहरापासून ५० कि.मी.पर्यंतच्या परिसरात व्यापारी शिवार खरेदी करतात. सुमारे ३० ते ४० व्यापारी शिवार खरेदी करत असून मुंबई येथे माल पाठविला जात आहे. या मालाला सरासरी दर मिळत आहे.- राजेश अग्रहारी, भाजीपाला व्यापारी
कोट-
मागील चार वर्षांपासून आमचा मुंबईत भाजीपाला व्यवसाय असून आम्ही थेट सोसायट्यांना भाजीपाला पुरवतो. लॉकडाऊनच्या काळातही हा व्यवसाय बऱ्यापैकी सुरू आहे. जो माल आमच्याकडे नाही तो आम्ही इतर शेतकऱ्यांकडून खरेदी करतो, यामुळे शेतकऱ्यांनाही दोन पैसे मिळत आहेत. - सचिन पिंगळे, शेतकरी गट संचालक