साखर घेण्यास आलेले १५ ट्रकचालक अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:35 AM2019-02-11T00:35:05+5:302019-02-11T00:36:54+5:30

देवळा येथील वसंतदादा साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी थकीत पगार, कामगार करार व इतर मागण्यांसाठी २२ जानेवारीपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे; मात्र, कारखाना भाडेतत्त्वावर घेतलेल्या धाराशीव कारखान्याचे अध्यक्ष व प्रशासकीय मंडळाने अद्याप या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे कामगारांनी थकीत वेतनाच्या मुद्द्यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करीत कारखान्यातून साखर उचलण्यासाठी आलेले राज्यस्थानचे ७ ट्रकसह १५ ड्रायव्हर व क्लीनर यांना बंदिस्त केल्याचा आरोप नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अंजू सिंघल व दिलीपसिंह बेनीवाल यांनी रविवारी (दि. १०) पत्रकार परिषदेत केला आहे.

15 truck drivers who got to get sugar were stuck | साखर घेण्यास आलेले १५ ट्रकचालक अडकले

साखर घेण्यास आलेले १५ ट्रकचालक अडकले

Next
ठळक मुद्देवसाका : नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप

नाशिक : देवळा येथील वसंतदादा साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी थकीत पगार, कामगार करार व इतर मागण्यांसाठी २२ जानेवारीपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे; मात्र, कारखाना भाडेतत्त्वावर घेतलेल्या धाराशीव कारखान्याचे अध्यक्ष व प्रशासकीय मंडळाने अद्याप या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे कामगारांनी थकीत वेतनाच्या मुद्द्यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करीत कारखान्यातून साखर उचलण्यासाठी आलेले राज्यस्थानचे ७ ट्रकसह १५ ड्रायव्हर व क्लीनर यांना बंदिस्त केल्याचा आरोप नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अंजू सिंघल व दिलीपसिंह बेनीवाल यांनी रविवारी (दि. १०) पत्रकार परिषदेत केला आहे.
थकीत पगार, कामगार करार व इतर मागण्यांसाठी २२ जानेवारीपासून वसंतदादा सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे; परंतु कारखाना प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचाºयांचे आंदोलन कायम आहे. जोपर्यंत मागण्यांवर चर्चा होत नाही, तोपर्यंत साखर व मळी कारखान्याबाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा कामगारांनी दिला आहे. त्यामुळे कारखान्यात २० जानेवारीला साखर उचलण्यासाठी आलेले राजस्थानचे सात ट्रक ड्रायव्हर व क्लीनरसह कारखान्यात अडकून पडले आहे. हे ट्रक श्रीनाथ ट्रान्सपोर्ट कंपनीचे असून, कंपनीने ट्रक व कामगारांना सोडविण्यासाठी देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करून मदत मागितली. परंतु, मदत मिळत नसल्याने कंपनीने नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या सहकार्याने उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर व जिल्हा पोलीस अधीक्षक संजय देवरे यांनाही निवेदन देऊन मदतीची मागणी केली. परंतु, प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोप वाहतूकदारांनी केला
आहे. यावेळी शक्तिसिंह राजपुरोहित, प्रदीपसिंह चौधरी, हनुमान बेनीवाल, ईश्वर जाट, नरसिंह चौधरी, खेताराम चौधरी आदी उपस्थित होते.
ट्रकसह कामगारांना सोडावे
गेल्या २० ते २१ दिवसांपासून ट्रकसोबत ड्रायव्हर आणि क्लीनरही कारखान्यात अडकून पडले आहेत. यातील सात ट्रकमध्ये सुमारे २०० टनांहून अधिक माल भरलेला असून, ट्रक एका जागेवर उभे आहेत. त्यामुळे टायरचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान ट्रकमधून साखर खाली करून रिकामे ट्रक आणि कामगारांना तरी सोडण्यात यावे, अशी मागणी ट्रकमालकांनी केली आहे.

Web Title: 15 truck drivers who got to get sugar were stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.