१५ टक्केच भाजीपाला मुंबईकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 01:06 AM2017-08-30T01:06:14+5:302017-08-30T01:06:19+5:30
मुंबई शहर व उपनगरांमध्ये मंगळवारी सकाळपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून दैनंदिन पाठविल्या जाणाºया भाजीपाल्याच्या तुलनेत मंगळवारी अवघा पंधरा टक्के माल खरेदीदार तसेच व्यापाºयांच्या जबाबदारीवर रवाना करण्यात आला आहे.
पंचवटी : मुंबई शहर व उपनगरांमध्ये मंगळवारी सकाळपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून दैनंदिन पाठविल्या जाणाºया भाजीपाल्याच्या तुलनेत मंगळवारी अवघा पंधरा टक्के माल खरेदीदार तसेच व्यापाºयांच्या जबाबदारीवर रवाना करण्यात आला आहे. मुंबईत पाऊस सुरू असल्याने त्याचा परिणाम नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सायंकाळी होणाºया लिलावावर झाला. मुंबईभर पाणी साचल्याने भाजीपाला पोहोचणे शक्य नसल्याने जवळपास सर्वच पालेभाज्यांचे बाजारभाव पन्नास टक्क्यांनी घसरले. नाशिक बाजार समितीतून दैनंदिन पन्नास चारचाकी वाहने भरून पालेभाज्या माल मुंबई, ठाणे, कल्याण बाजारात जातो. मंगळवारी सकाळपासून मुंबईत पाऊस सुरू असल्याने केवळ १० ते १५ वाहने भरून सायंकाळी पालेभाज्या माल रवाना झाला आहे. सायंकाळी घोटीपासून पुढे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबविली होती. पावसाचा जोर ओसरला तरच मुंबईकडे भाजीपाला वाहने पोहचतील अन्यथा सर्वच पालेभाज्या माल अन्य बाजारात पाठवावा लागण्याची शक्यता आहे.
मुंबई व उपनगरांत सकाळपासून अतिवृष्टी सुरू आहे. नाशिक बाजार समितीतून पाठविलेला शेतमाल वेळेवर पोहोचेल याची शाश्वती नाही. बाजार समितीतून केवळ दहा ते बारा चारचाकी वाहने पालेभाज्या माल मुंबईत रवाना केला असला तरी तो माल व्यापारी व खरेदीदार यांच्या जबाबदारीवर पाठविला आहे. पालेभाज्या माल सहसा ठाणे तसेच कल्याणपर्यंत जाईल, असे दिसते.
- अरुण काळे, सचिव, कृउबा, नाशिक