१५० बसेस ‘कोरोना फ्री’; प्रवासी मात्र बेफिकीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:17 AM2021-09-22T04:17:29+5:302021-09-22T04:17:29+5:30
नाशिक : कोरेानाच्या निर्बंधाचा सर्वाधिक फटका बसला तो एस. टी. महामंडळाला. गेल्या दीड वर्षांपासून एस. टी. आर्थिक संकटातून जात ...
नाशिक : कोरेानाच्या निर्बंधाचा सर्वाधिक फटका बसला तो एस. टी. महामंडळाला. गेल्या दीड वर्षांपासून एस. टी. आर्थिक संकटातून जात आहे. प्रवासी वाहतूक पुरेशा क्षमतेने सुरू नसल्यामुळे नियमित उत्पन्नात मोठी घट झाल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाही प्रश्न उभा राहतो. आता निर्बंध बऱ्यापैकी उठविले गेले असले तरी प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची खात्री देता यावी यासाठी राज्य परिवहन महामंडळाने एस.टी बसेस ’कोरोना फ्री’ करवून घेण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार या बसेस विशिष्ट द्रव्याच्या साह्याने काेरोना फ्री केल्या जात आहेत. त्यामुळे जवळपास तीन महिने या बसेस वायरस फ्री राहाणार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे.
नाशिक विभागातील सुमारे ५४० बसेस या टप्प्याटप्याने मायक्रोबिअल कोटिंग केल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होणार आहे. मात्र, प्रवाशांनी बसेसमध्ये देखील दक्षता घेणे अपेक्षित आहे. चेहऱ्याला मास्कचा वापरणे करणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही.
--इन्फो--
किती बसेसला कोटिंग?
नाशिक-१: ९०------------६०
पिंपळगाव : ३०--------------००
येवला : ३०----------------००
पेठ: २५-------------------००
कळवण: ४५----------------००
इगतपुरी: २५-----------------००
नांदगाव : ४०------------------००
सटाणा: ५०-------------------००
सिन्नर: ५०---------------- ५०
मनमाड: ४०---------------००
मालेगाव : ४५---------------००
पंचवटी: ४०----------------४०
--इन्फो--
एका वर्षात चारवेळा होणार कोटिंग
एकदा बसला कोटिंग केले तर त्याचा प्रभाव हा किमान तीन महिने राहाणार आहे. त्यामुळे तीन महिने तर अशा बसमधून प्रवास सुरक्षित ठरणार आहे. या बसेस वर्षभर सुरू राहाणार असल्यामुळे वर्षातून चार वेळा एका बसला मायक्रोबिअल कोटींग केले जाणार आहे. याबाबचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून जिल्ह्यातील १३ आगारांचे नियोजन करण्यात आले आहे.
--इन्फो--
बाधित व्यक्ती उठून गेली असेल तर धोका नाही; पण बाजूला बसला असल्यास?
१) मायक्रोबिअल कोटिंग केल्यानंतर बसचा आतील भाग, सीट, दांडा, म्हणजे जेथे जेथे हात लागेल अशी जागा सुरक्षित असणार आहे.
२) जर एखाद्या प्रवाशाने मास्क लावलेला नसेल आणि तो बाधित असेल तर मात्र त्याच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला धोका असू शकतो.
--इन्फो---
प्रवासी म्हणतात
बसमधून प्रवास करणे सुरक्षित असतेच आता मायक्रोबिअल कोटिंग होणार असल्यामुळे सुरक्षितता अधिक वाढणार आहे. त्यामुळे अधिक निश्चिंतपणे प्रवास होऊ शकेल. सर्वच प्रवाशांनी स्वत:ची काळजी घेतली तर सर्वांनाच त्याचा लाभ होईल.
- अरविंद कानडे, प्रवासी
प्रवाशांच्या हितासाठी महामंडळाकडून उचलण्यात आलेेले पाऊल सकारात्मक आहे. अडचणीच्या काळातून एस.टी. जात असतानाही प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी जर अशाप्रकार कोटिंग केले जाणार असेल तर महामंडळाचे आभार मानायला हवे. प्रवाशांच्या हिताला एस.टी.ने नेहमीच प्राधान्य दिले आहे.
- भागवत राऊत, प्रवासी
कोरोनाचे संकट असतांनाही लोकांना प्रवास करणे महत्त्वाचे असते अशावेळी मायक्रोबिअल कोटिंग केलेल्या बसमधून प्रवास करण्याचा दिलासा मिळणार आहे. दैनंदिन प्रवास करणाऱ्या आमच्यासारख्या प्रवाशांना यामुळे मोठा आधार वाटत आहे. महामंडळाकडून अशी संकल्पना राबविणे कौतुकास्पद आहे.
- श्याम कुंभकर्ण, प्रवासी.