जिल्ह्यात १५१ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:35 AM2021-02-05T05:35:16+5:302021-02-05T05:35:16+5:30
नाशिक : जिल्ह्यात सोमवारी (दि.१) एकूण १५१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, १६० रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले आहेत. ...
नाशिक : जिल्ह्यात सोमवारी (दि.१) एकूण १५१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, १६० रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले आहेत. दरम्यान, नाशिक मनपा क्षेत्रात एकाचा मृत्यू झाला असल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २०५२ वर पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १५ हजार ९७४ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख १२ हजार ५९७ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर १३२५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९७.०९ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.७७, नाशिक ग्रामीण ९६.२०, मालेगाव शहरात ९३.०७, तर जिल्हाबाह्य ९४.८४ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या ५ लाख २९६ असून, त्यातील ३ लाख ८३ हजार ६९१ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख १५ हजार ९७४ रुग्ण बाधित आढळून आले असून, ६३१ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.