नाशकात आढळले १५३ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:20 AM2020-12-30T04:20:14+5:302020-12-30T04:20:14+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात जरी असला तरी शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे अद्याप थांबलेले नाही. यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणेेदेखील ...
कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात जरी असला तरी शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे अद्याप थांबलेले नाही. यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणेेदेखील तितकेच गरजेचे आहे. आगामी थर्टीफर्स्टच्या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी एकत्र येत आनंदोत्सव साजरा करण्याला नागरिकांनी यंदा फाटा देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सार्वजनिकरित्या होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.
मंगळवारी दिवसभरात संपूर्ण जिल्ह्यात १५३ रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्याची आतापर्यंतची रुग्णसंख्या १ लाख ९ हजार ४८८ वर पोहचली आहे. त्यापैकी १ लाख ५५ हजार ४९ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. तसेच जिल्ह्यात एकूण १ हजार ९६२ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर जिल्ह्यात सुमारे ९६.४० टक्के असून ही नाशिककरांना दिलासा देणारी बाब आहे. आतापर्यंत झालेल्या तपासणीतून ३ लाख १५ हजार १५१ नागरिक निगेटिव्ह आले आहेत. एकूण ३ हजार २४० अहवाल अद्याप प्रलंबित आहे. नाशिक महापालिका क्षेत्रातून मंगळवारी १ हजार १९१ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. सध्या शहरात १ हजार २६८ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहे. कोरोनाबाधित येण्याचा दर २५.५९ टक्के असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.