२१ जागांसाठी १५८ उमेदवारांचे अर्ज
By admin | Published: May 23, 2017 01:57 AM2017-05-23T01:57:41+5:302017-05-23T01:57:54+5:30
नाशिक : जिल्हा परिषद सरकारी कर्मचारी व परिषद कर्मचारी बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत २१ जागांसाठी १५८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा परिषद सरकारी कर्मचारी व परिषद कर्मचारी बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत २१ जागांसाठी १५८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. मंगळवारी (दि. २३) छाननी व बुधवारी (दि. २४) वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषद सरकारी कर्मचारी व परिषद बॅँकेच्या निवडणुकीमध्ये दोन पॅनलमध्ये सरळ लढत होण्याची चिन्हे असून, विद्यमान सहा संचालक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच प्रशांत जगताप, भाऊसाहेब खातळे, सुधीर पगार असे तीन शाखा अभियंता तसेच अनेक मातब्बर या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. १५८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात विद्यमान संचालक विजयकुमार हळदे, शिरीष भालेराव, सुधीर पगार, प्रमोद निरगुडे, सुनील बच्छाव, भाऊसाहेब खातळे या सहा संचालकांसह छाया पाटील, प्रवीण भाबड, अरुण ठाकरे, संदीप पाटील, प्रशांत गोवर्धने, दीपक अहिरे, दिलीप सलादे, मंगेश पवार, सुनील गिते, अशोक शिंदे, धनश्री कापडणीस, दिलीप थेटे, प्रकाश थेटे, नंदकिशोर सोनवणे, सुनील बच्छाव, अनिल घुगे, अजित आव्हाड, प्रशांत कवडे, सचिन इंचोलकर, मंदाकिनी पवार यांचा समावेश आहे. मंगळवारी (दि.२३) उमेदवारी अर्जांची छाननी, २४ मेला पात्र उमेदवारांची यादी, २४ मे ते ७ जून दरम्यान उमेदवारी उर्ज माघारी, ८ जून रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप, १८ जून मतदान व १९ जून रोजी मतमोजणी घेण्यात येणार आहे.