जिल्ह्यात १५८ रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 01:15 AM2021-01-05T01:15:42+5:302021-01-05T01:16:00+5:30
नाशिक जिल्ह्यात साेमवारी (दि. ४) बाधितांच्या संख्येत १९० रुग्णांची भर पडली असून, १५८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, तर मृतांच्या संख्येत ५ने भर पडल्याने एकूण बळींची संख्या १,९८८ वर पोहोचली आहे.
नाशिक : जिल्ह्यात साेमवारी (दि. ४) बाधितांच्या संख्येत १९० रुग्णांची भर पडली असून, १५८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, तर मृतांच्या संख्येत ५ने भर पडल्याने एकूण बळींची संख्या १,९८८ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या १ लाख ११ हजार ७२ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख ७ हजार ३०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. १,७७६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९६.६१ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.१२, नाशिक ग्रामीण ९६.११, मालेगाव शहरात ९२.६७ तर जिल्हाबाह्य ९४.०७ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १,७७६ बाधित रुग्णांमध्ये १,११६ रुग्ण शहरात, ४८५ रुग्ण ग्रामीणला, १६३ रुग्ण मालेगावमध्ये तर १२ रुग्ण जिल्हाबाह्य क्षेत्रामधील आहेत. आतापर्यंत चाचण्यांची संख्या चार लाख ४६ हजार ०८६ असून, त्यातील ३ लाख ३१ हजार ९०१ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख ११ हजार ७२ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.