पंधराव्या वित्त आयोगातून जि.प. सदस्यांना ३६ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:12 AM2021-06-25T04:12:20+5:302021-06-25T04:12:20+5:30
चाैकट=== काय आहेत बंधित-अबंधित कामे? * बंधित निधीतून स्वच्छता आणि हगणदारीमुक्त कामांबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांची देखभाल दुरुस्ती तसेच पेयजल ...
चाैकट===
काय आहेत बंधित-अबंधित कामे?
* बंधित निधीतून स्वच्छता आणि हगणदारीमुक्त कामांबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांची देखभाल दुरुस्ती तसेच पेयजल पाणीपुरवठा, जल पुनर्भरण या बाबींसाठी खर्च करता येईल.
* अबंधित निधीतून २५ टक्के आरोग्य, शिक्षण व उपजीविका उपक्रमासाठी खर्च करता येईल. १० टक्के निधी महिला व बाल कल्याण उपक्रमांंसाठी, त्यातही लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती, जमातीवर खर्च करावयाचा आहे. या निधीतून जवळपास २० प्रकारची कामे करण्याची मुभा आहे.
चौकट===
पदाधिकारी, गटनेते मालामाल
पंधराव्या वित्त आयोगातून प्रत्येक सदस्याच्या गटात ३६ लाखांची कामे केली जाणार असली, तरी पदाधिकारी, गटनेते, विरोधी पक्ष नेत्यांना मात्र त्यापेक्षा अधिकचा निधी मिळणार असल्याची चर्चा होत आहे. त्यातही अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, विरोधी पक्षनेते व त्यानंतर प्रत्येक पक्षाच्या गटनेत्याला ‘मालामाल’ केले जाणार असल्याने या निधी वाटपाबाबत तक्रार वा आरडाओरड होण्याची शक्यता कमीच आहे.