१६ शेतकऱ्यांची फसवणूक : पिंपळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल; महिनाभरातील तिसरी घटना द्राक्ष व्यापाºयाकडून २८ लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 12:09 AM2018-04-06T00:09:22+5:302018-04-06T00:09:22+5:30
कसबे सुकेणे : सोळा द्राक्ष उत्पादकांची साडेअठ्ठावीस लाख रु पयांची फसवणूक करून द्राक्ष व्यापाºयाने पोबारा केला आहे.
कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील सोळा द्राक्ष उत्पादकांची साडेअठ्ठावीस लाख रु पयांची फसवणूक करून एका द्राक्ष व्यापाºयाने पोबारा केला आहे. गुरुवारी (दि. ५) सदर व्यापाºयाचा शोध घेऊनही तो मिळून न आल्याने व द्राक्ष खरेदीपोटी दिलेले धनादेश न वटल्याने फसवणूक झालेल्या सोळा शेतकºयांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना पुन्हा एकदा द्राक्ष व्यापाºयाने शेतकºयांची फसवणूक केली आहे. निफाड तालुक्यातील देवपूर, दावचवाडी, रौळस पिंपरी, लोणवाडी, पाचोरे वणी, जोपूळ, रुई येथील सुमारे सोळा शेतकºयांनी त्यांचा द्राक्ष माल द्राक्ष व्यापारी राजकुमार परशराम चुग, अजमेर (राजस्थान) हल्ली मुक्काम पिंपळगाव यांना उधारीवर दिला होता. द्राक्ष व्यवहारापोटी सदरच्या व्यापाºयाने बहुतांश शेतकºयांना धनादेश दिले होते, तर काहींना रोख रक्कम देण्याचे कबूल केले होते; परंतु गेल्या काही दिवसांपासून बºयाच शेतकºयांचे धनादेश न वटल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या सर्व शेतकºयांनी गुरुवारी दुपारी पिंपळगाव बसवंत गाठले. पिंपळगाव बसवंत येथे सद्या वास्तव्यास असलेल्या ठिकाणी शोध घेतला असता व्यापारी मिळून आला नाही तसेच मोबाइलही बंद असल्याने राजस्थानमधील मूळगावी तपास केला तेथेही तो नसल्याचे समजले, अशी माहिती संतोष शिरसाठ यांनी दिली. दरम्यान, व्यापाºयाच्या विरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ निफाड तालुक्यातून गेल्या महिन्यात उगाव परिसरातही द्राक्ष व्यापारी पळून जाण्याची घटना ताजी असताना आजची ही घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे द्राक्षपंढरीतील द्राक्ष उत्पादकांचे धाबे दणाणले आहेत. द्राक्ष व्यापाºयाकडून फसवणूक झाल्याची तक्र ार दाखल करण्यासाठी सर्व सोळा शेतकरी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे येथे गेले असता, तेथे तक्र ार दाखल करण्यास पोलिसांनी सुरु वातीला टाळाटाळ केल्याची माहिती संतोष शिरसाठ यांनी दिली. तक्र ार ऐकून घेण्याऐवजी पोलिसांकडून शेतकºयांना उलट उपदेश करण्यात आल्याचे समजते. त्यानंतर या शेतकºयांनी ही कैफियत पिंपळगाव बाजार समितीचे सभापती माजी आमदार दिलीप बनकर व आमदार अनिल कदम यांच्याकडे मांडली.