जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले १६ बाधित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 09:25 PM2020-06-12T21:25:23+5:302020-06-13T00:15:09+5:30

नाशिक : जिल्ह्यात एकाच दिवशी १६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यात मनमाडच्या एकाच कुटुंबातील नऊ, पिंपळगाव बसवंतचे दोन, येवल्यातील दोन, चाटोरी येथील एक तसेच इगतपुरी तालुक्यातील शेणित व भरवीर खुर्द येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

16 infected patients were found in the district on the same day | जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले १६ बाधित रुग्ण

जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले १६ बाधित रुग्ण

Next

नाशिक : जिल्ह्यात एकाच दिवशी १६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यात मनमाडच्या एकाच कुटुंबातील नऊ, पिंपळगाव बसवंतचे दोन, येवल्यातील दोन, चाटोरी येथील एक तसेच इगतपुरी तालुक्यातील शेणित व भरवीर खुर्द येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
कुटुंबातील नऊजण बाधित

मनमाड : शुक्रवारी (दि. १२) आलेल्या अहवालात एकाच कुटुंबातील नऊ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात कोरोनाचे आतापर्यंत ४६ रुग्ण आढळून आल्याने शहराची वाटचाल हॉटस्पॉटच्या दिशेने सुरू झाली आहे.
मनमाड शहरातील आनंदवाडी भागात २ मे रोजी कोरोनाचा शिरकाव झाला होता, तर ३ तारखेपासून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेली. दरम्यान, शुक्रवारी प्राप्त झालेल्या कोरोनाच्या अहवालात शहरातील बोहरी कंपाउण्ड भागातील एकाच कुटुंबातील नऊ रुग्ण आढळून आले आहेत. या कुटुंबातील तीन व सहा वर्षांच्या बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी शाकुंतल नगरमध्ये एकाच कुटुंबातील १४ जणांना तर निमोन चौफुली भागात एकाच कुटुंबातील सात जणांना कोरोनाची लागण झाली होती. सध्या शहरात नऊ भाग कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत.
---------------------
पिंपळगाव शहरात दोन रु ग्णांची भर
शहरात शुक्र वारी (दि. १२) नव्याने दोन कोरोनाबाधित रु ग्णांची भर पडली आहे. एक २६ वर्षीय महिला व पाचवर्षीय मुलगा हे माळी गल्लीतील मृत कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी चेतन काळे यांनी दिली. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्याने बाजारपेठेतील अनेक दुकाने उघडू लागली आहेत. नागरिकही बाजारात खरेदीसाठी गर्दी करू लागले होते. शासनाने आखून दिलेले नियम व सूचना पायदळी तुडवत फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र कोरोनाचा एकही रु ग्ण नसलेल्या भागात बघावयास मिळत होते. परंतु शहरातील व्यापार भवन येथे तरु ण कोरोनाबाधित सापडल्याने तो परिसर सील करण्यात आला होता.
-------------------------
येवल्यात दोन बाधित; महिलेचा मृत्यू
येवला शहरातील गंगादरवाजा भागातील कोरोनाबाधित ५० वर्षीय महिलेचा शुक्रवारी (दि. १२) जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तालुक्यातील कोरोना बळींची संख्या चार झाली आहे. दरम्यान, शुक्र वारी शहरातील एका पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बुंदेलपुरा भागातील बाधित ७२ वर्षीय ज्येष्ठाचा गुरु वारी (दि. ११) जिल्हा रु ग्णालयात मृत्यू झाला. यापूर्वी शहरातील मोरे वस्ती येथील एका ३६ वर्षीय तरु णाचा, तर तालुक्यातील न्याहारखेडे खुर्द येथील २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता.
या महिलेचा अंत्यविधी सुरू असतानाच तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच बालाजी गल्ली येथील ४६ वर्षीय पुरु षाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Web Title: 16 infected patients were found in the district on the same day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक