कळवण गटात १६; गणात ४२ उमेदवार
By admin | Published: February 14, 2017 12:08 AM2017-02-14T00:08:05+5:302017-02-14T00:08:17+5:30
निवडणूक : जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी तालुक्यात दोन गटात ७, तर सहा गणात १७ माघारी
कळवण : जिल्हा परिषदेच्या मानूर व अभोणा गटातून सहा इच्छुक उमेदवारांनी, तर पंचायत समितीच्या खर्डेदिगर, मोकभणगी, निवाणे, बापखेडा, अभोणा व नरूळ
गणातून १७ इच्छुकांनी माघार घेतल्याने चार गटातून १६, तर आठ गणातून ४२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी अभोणा गटातून, तर गणातून डी. एम. गायकवाड, नरूळ गणातून सरला देवरे या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांनी माघार घेतल्याने अभोणा गटावर कॉँग्रेस वर्चस्वाची परंपरा कायम रहाणार आहे.
मानूर गटात राष्ट्रवादी कॉँग्रेस व माकप अशी दुरंगी लढत होणार आहे. या गटातून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य भारती पवार निवडणूक लढवित आहे. अभोणा गटात कॉँग्रेस, भाजपा व माकप अशी तिरंगी लढत होणार आहे.
कनाशी गटात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा, माकप व अपक्ष अशी पंचरंगी लढत होणार आहे. या गटातून जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार रिंगणात आहे. खर्डेदिगर गटातून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून निवडणूक लढवित आहेत. मोकभणगी गणात
राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस, भाजपा, माकप व अपक्ष अशी पंचरंगी लढत होत आहे.
निवाणे गणातून राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना, भाजपा, माकप व अपक्ष अशी षष्टरंगी लढत होत आहे. मानूर गणात राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस, माकप व अपक्ष अशी चौरंगी लढत होत आहे. बापखेडा गणातून राष्ट्रवादी र्कांग्रेस, कॉँग्रेस, भाजपा, माकप अशी चौरंगी लढत होत आहे. कनाशी गणात राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस, भाजपा, माकप व अपक्ष अशी षष्टरंगी लढत होत आहे.
अभोणा गणातून राष्ट्रवादी र्कांग्रेसचे कळवण बाजार समतिीचे संचालक डी. एम. गायकवाड, तुळशिराम बागुल, जयराम ठाकरे, मनोहर ठाकरे यांनी माघार घेतल्याने कॉँग्रेस, भाजपा, शिवसेना, माकप व अपक्ष अशी षष्टरंगी लढत होईल.
नरूळ गणातून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सरला देवरे, सरला मोरे, मनीषा देवरे यांनी माघार नोंदवल्याने कॉँग्रेस, भाजपा, शिवसेना, भाजपा, माकप व अपक्ष अशी पंचरंगी लढत होणार आहे .
माघारीनंतर जिल्हा परिषद खर्डेदिगर गटात सहा, मानूर गटात दोन, कनाशी गटात पाच, तर अभोणा गटातून तीन उमेदवार रिंगणात आहेत. पंचायत समितीच्या खर्डेदिगर गणातून सहा, मोकभणगी गणातून पाच, निवाणे गणातून सहा, मानूर गणातून चार, बापखेडा गणात चार, कनाशी गणात सहा, अभोणा गणात सहा, तर नरूळ गणातून पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
मानूर व अभोणा येथे चुरस
मानूर गणात कॉँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांचा अर्ज अवैध झाल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेससमोर माकपचे आव्हान असले तरी कॉँग्रेसने ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. अभोणा गटात कॉँग्रेससमोर भाजपा व माकपचे आव्हान असले तरी कॉँग्रेसचा गट व गणात ‘एकला चलो रे’चा नारा असणार आहे. समझोता व राजकीयदृष्ट्या बेरजेचे राजकारण राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून तालुक्यात झाले. कनाशी व खर्डेदिगर गटात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विरोधात कॉँग्रेस उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने दोन गटात आघाडी, तर दोन गटात मैत्रिपूर्ण लढत बघायला मिळणार आहे. (वार्ताहर)