भारत दूरसंचार निगमचे १६ मोबाइल टॉवर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 01:04 AM2018-03-28T01:04:05+5:302018-03-28T01:04:05+5:30
नाशिक : मनपाच्या कर विभागाने शहरातील बीएसएनएलचे १६ मोबाइल टॉवर्सवर जप्तीची कारवाई केली आहे. बीएसएनएलकडे एक कोटी ९७ लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकूळकर यांनी दिली. महापालिकेच्या या कारवाईविरोधात बीएसएनएलने २००६ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली होती. त्यामुळे बारा वर्षापासून त्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते. महापालिकेने कायदेशीर बाबी बारकाईने तपासून पाहिल्या असता, न्यायालयाने केवळ इंदिरानगर, नाशिकरोड आणि सिडको येथील तीन टॉवर्सपुरता स्थगिती आदेश दिलेला होता. त्यानुसार, महापालिकेने सदर तीन टॉवर्स वगळून शहरातील बीएसएनएलच्या अन्य १६ मोबाइल टॉवर्सवर जप्तीची कारवाई केली.