नाशिकच्या १६ पोलिसांना पोलीस निरीक्षकपदी बढती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:18 AM2021-02-25T04:18:11+5:302021-02-25T04:18:11+5:30
चालू महिन्याच्या प्रारंभीच सेवाज्येष्ठतेनुसार ६५० पेक्षा जास्त अधिकाऱ्यांबाबतची माहिती व संवर्ग पोलीस मुख्यालयाने मागविली होती. आस्थापना विभागाकडून त्याची छाननी ...
चालू महिन्याच्या प्रारंभीच सेवाज्येष्ठतेनुसार ६५० पेक्षा जास्त अधिकाऱ्यांबाबतची माहिती व संवर्ग पोलीस मुख्यालयाने मागविली होती. आस्थापना विभागाकडून त्याची छाननी करण्यात आल्यानंतर पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पदोन्नतीचे आदेश काढले. शहर पालीस दलातील सात, तर ग्रामीण पोलीस दलातील आठ आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील एक अशा सोळा सहायक निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळाली आहे. नगराळे यांनी काढलेल्या आदेशात संबंधित अधिकाऱ्यांना नवनियुक्तीसाठी त्वरित कार्यमुक्त करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.
--इन्फो--
पोलीस निरीक्षक- सध्या नियुक्त - पदस्थापनेचे ठिकाण
१) द्वारका विश्वनाथ डोखे- शहर पोलीस पोलीस अकादमी
२) मनीषा बाळकृष्ण राऊत- शहर पोलीस पोलीस अकादमी
३) किशेार सोमनाथ मानभाव- शहर पोलीस गडचिरोली
४) नितीन जगन्नाथ कंडारे - शहर पोलीस मुंबई शहर
५) रमेश बाबा वळवी नाशिक - शहर पोलीस वि. सु. वि
६) मंगेश नंदकिशोर मजगर- शहर पोलीस मुंबई शहर
७) मनोज सर्जेराव शिंदे - शहर पोलीस मुंबई शहर
हेमंतकुमार साहेबराव भामरे - लाचलुचपत म.सु.प लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
........
१) समीर सुरेश अहिरराव- नाशिक ग्रामीण वसई विरार
२) रणजित नारायण माने- नाशिक ग्रामीण पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर
३) सचिन मुरलीधर खैरणार- नाशिक ग्रामीण द.वि.प.
४) प्रवीण वीरसिंग पाडवी- नाशिक ग्रामीण लोहमार्ग मुंबई
५) मनोहर दौलतराव पगार- नाशिक ग्रामीण मुंबई शहर
६) गणेश सुभाष गिरी- नाशिक ग्रामीण वि.सु.वि.
७) स्वप्ना सिदाप्पा शहापूरकर- नाशिक ग्रामीण मुंबई शहर
८) महेश यशवंत मांडवे- नाशिक ग्रामीण मुंबई शहर