मालेगाव शहरात नवे १६ कोरोनाबाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 10:48 PM2020-07-03T22:48:37+5:302020-07-04T00:45:58+5:30
मालेगाव : शहरातील ११५ जणांच्या घशातील स्रावांचे नमुने मिळाले असून, त्यातील १६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यात पवारवाडी पोलीस ठाण्यातील पाच पोलिसांचा समावेश असल्याने पोलिसांमध्ये घबराट पसरली आहे.
मालेगाव : शहरातील ११५ जणांच्या घशातील स्रावांचे नमुने मिळाले असून, त्यातील १६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यात पवारवाडी पोलीस ठाण्यातील पाच पोलिसांचा समावेश असल्याने पोलिसांमध्ये घबराट पसरली आहे. पवारवाडी पोलीस ठाण्यातील ३० वर्षी इसम, ३१ वर्षीय इसम, २८ वर्षीय तरुण, २९ वर्षीय तरुण, ३२ वर्षीय तरुण असे पाच जण बाधित मिळून आले.
सोयगावच्या जयरामनगर भागातील ५६ वर्षीय महिला, पाटणे येथील आनंदाश्रम येथील ५४ वर्षीय महिला, जळकू येथील १२ आणि १३ वर्षाच्या दोन मुलींसह ७० वर्षीय वृद्ध महिला बाधित झाली आहे. झोडगे येथील ३० वर्षीय महिला, जाजुवाडीच्या मुक्ताई कॉलनीतील ५० वर्षीय इसम, मालेगाव कॅम्पातील ज्ञानेश्वर नगर येथील ६० वर्षीय इसम, जाफरनगर भागातील ७० वर्षीय वृद्ध, नूरबाग भागातील २८ वर्षीय तरुण आणि नामपूर येथील योगायोग चौकातील ६७ वर्षीय वृद्ध महिला बाधित मिळून आले.