नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात 16 नवीन न्यायाधीश करणार न्यायदान; तीनही स्तरांवरील १४ न्यायाधीशांची बदली
By अझहर शेख | Published: April 8, 2023 04:34 PM2023-04-08T16:34:03+5:302023-04-08T16:35:01+5:30
मुंबई उच्च न्यायालयाने राज्यभरातील ८८ जिल्हा न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत.
नाशिक : मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व जिल्ह्यांतील विविध स्तरांवरील न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. यानुसार नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातील वरिष्ठ स्तर दिवाणी व दिवाणी न्यायालयांतील एकुण चौदा न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्या रिक्त पदांवर प्रतिनियुक्तीने सोळा न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे लवकरच नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयांमध्ये नवीन न्यायाधीशांकडून न्यायदानाचे कामकाज पार पाडले जाणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने राज्यभरातील ८८ जिल्हा न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. यामध्ये नाशिकच्या आठ न्यायाधीशांचा समावेश आहे. वरिष्ठ दिवाणी गटातील १०२ न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नाशिकमधील दोन न्यायाधीशांचा समावेश आहे. एका वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांची नाशिकमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. १११ दिवाणी न्यायाधीशांच्या बदल्यांमध्ये नाशिकमधील सहा न्यायाधीशांचा समावेश आहे. नाशिकमध्ये नव्याने पाच दिवाणी न्यायाधीशांना नियुक्त करण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयातील रजिस्ट्रार जनरल आर. एन. जोशी यांनी बदल्यांचे आदेश पारित केले आहेत.
नाशिकमध्ये या जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती
१) एन. व्ही. जीवने (मुंबई) नाशिक,
२) पी. एम. बेदार (नागपूर),
३) एल. डी. बिले (रत्नागिरी),
४) श्रीमती पी. व्ही. घुले (मुंबई),
५) जे. एम. दळवी (लातूर),
६) एम. आय. लोकवाणी (मुंबई).
--पॉइन्टर--
मालेगावात नियुक्त जिल्हा न्यायाधीश
१) एस. एस. कंठाळे (नागपूर)
२) के. आर. पाटील (बीड)
---पॉइन्टर---
नाशिकमध्ये नियुक्त वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश
१) आर. आर. खान (मुंबई)
२) श्रीमती ए. जी. बेहरे (कोल्हापूर)
- -इन्फो--
नाशिकमध्ये नियुक्त दिवाणी न्यायाधीश
१) श्रीमती आर. सी. नारवाडिया - जिल्हा न्यायालय
२) श्रीमती एम. टी. खर्डे :- मनमाड तालुका न्यायालय
३) यू. पी. हिंगमिरे- सटाणा तालुका न्यायालय
४) श्रीमती. एस. व्ही. लाड, नांदगाव तालुका न्यायालय
५) पी. व्ही. जोशी - मोटार अपघात न्यायालय, ना.रोड
६) श्रीमती डी. आर. भंडारी, नाशिकरोड न्यायालय
------इन्फो----
या जिल्हा न्यायाधीशांची बदली (कंसात पदस्थापनेचे शहर)
१) व्ही. पी. देसाई (मुंबई)
२) एस. टी. त्रिपाठी : (लातूर)
३) डी. डी. कुरूल्कर : (परभणी)
४) एम. ए. शिंदे : (गडहिंगलज)
५) डी. व्हाय. गौड : (सांगली)
६) एस. एन. भालेराव : (अहमदनगर)
७) विकास शिवरुपराव कुलकर्णी : (मुंबई)
८) ए. यू. कदम : (मुंबई)
---
- - पॉइंटर---
नाशिकमधील दिवाणी न्यायाधीशांची बदली
१) एस. आर. निकम : (ठाणे)
२) एस. जी. दुबाळे : (पुणे)
३) ए. जी. तांबोळी : (अकोला)
४) ए. एन. सारक : (अहमदनगर)
५) श्रीमती एस. ए. लोमटे : (परभणी)
वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश
श्रीमती जी. ए. भागवत : ( पुणे )