येवला तालुक्यात १६ उमेदवारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 09:18 PM2020-12-24T21:18:55+5:302020-12-25T00:55:58+5:30

येवला : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. २४) एकूण १६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, दि. २५ ते २७ डिसेंबर रोजी शासकीय कार्यालयांना सुटी असल्याने आता थेट सोमवारीच उमेदवारी अर्ज दाखल होतील.

16 nominations filed in Yeola taluka | येवला तालुक्यात १६ उमेदवारी अर्ज दाखल

येवला तालुक्यात १६ उमेदवारी अर्ज दाखल

Next
ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : राजकीय हालचाली गतिमान

येवला : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. २४) एकूण १६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, दि. २५ ते २७ डिसेंबर रोजी शासकीय कार्यालयांना सुटी असल्याने आता थेट सोमवारीच उमेदवारी अर्ज दाखल होतील.

येवला तालुक्यात नगरसूल, मुखेड, पाटोदा, अंदरसूल, जळगाव नेऊर, सायगाव या प्रमुख ग्रामपंचायतींसह देवळाणे, अंगुलगाव, पारेगाव, नागडे, आडसुरेगाव, मातुलठाण, बल्हेगाव (वडगाव, बल्हेगाव), नांदूर, गणेशपूर, पिंपळगाव जलाल, कोळम बुद्रुक, अंगणगाव, धुळगाव, आडगाव रेपाळ, कानडी, सत्यगाव, विसापूर, पिंप्री, साताळी, बाभुळगाव खुर्द, आंबेगाव, बोकटे, आहेरवाडी (लहित, हडपसावरगाव, जायदरे), खरवंडी (देवदरी), रहाडी, भारम, रेंडाळे (न्याहारखेडे खुर्द, व बुद्रुक), कोळगाव (वाईबोथी), अनकुटे (सावखेडो), डोंगरगाव (पिंपळखुटे बुद्रुक), वाघाळे, अनकाई, देशमाने बुद्रुक, कोटमगाव खुर्द, राजापूर, नेऊरगाव, पुरणगाव, सातारे, एरंडगाव बुद्रुक, मुरमी, पिंपळगाव लेप, भाटगाव, सावरगाव, पिंपळखुटे बुद्रुक, खामगाव, ममदापूर, खिर्डीसाठे, पन्हाळसाठे (पिंपळखुटे तिसरे), धामोडे, कुसमाडी, उंदरवाडी, निमगाव मढ, महालखेडा पाटोदा, सोमठाण देश, ठाणगाव, देवठाण, धामणगाव, कातरणी, विखरणी, खैरगव्हाण, गुजरखेडे या ६९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यात बोच-या थंडीतही गावोगाव राजकीय उष्मा वाढता आहे.

Web Title: 16 nominations filed in Yeola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.