अभियांत्रिकी प्रवेशासाठी विभागात १६ हजार ५९१ जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 09:35 PM2020-07-18T21:35:50+5:302020-07-19T00:42:26+5:30
नाशिक : आयसीएस व सीबीएसई बोर्डच्या बारावी परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून, वेगवेगळ्या शाखेच्या विद्यार्थ्यांसह त्याच्या पालकांकडूनही पुढील प्रवेशासाठी विविध पर्यायांची चाचणी होत आहे.
नाशिक : आयसीएस व सीबीएसई बोर्डच्या बारावी परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून, वेगवेगळ्या शाखेच्या विद्यार्थ्यांसह त्याच्या पालकांकडूनही पुढील प्रवेशासाठी विविध पर्यायांची चाचणी होत आहे.
वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्राला मिळत असून, त्यातही अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते. अभियांत्रिकी प्रवेशासाठी नाशिक विभागात तब्बल १६ हजार ५९१ जागा उपलब्ध असून, नाशिक जिल्ह्यात यातील सर्वाधिक ७,६०६ जागांवर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या विविध शाखा प्रवेश घेता येणार आहे. नाशिक विभागात नाशिकसह अहमदनगर, धुळे जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यातील विद्यापीठांशी संलग्न एकूण ४८ अभियांत्रिकी तंत्रशिक्षण देणाºया संस्था आहेत. यात नाशिकमधील १९, नंदुरबार २, जळगाव १०, धुळे ५ व अहमदनगरच्या १२ महाविद्यालयाचा समावेश असून, नाशिकमध्ये सर्वाधिक ७,६०६, नगरमध्ये ४००५, जळगावमध्ये ३१२०, धुळ्यात १८६०, तर नंदुरबारमध्ये केवळ ६६० जागा उपलब्ध आहेत.
यावर्षी विद्यार्थ्यांना सर्व जागांवर संधी
गतवर्षी यातील केवळ ४९.७३ टक्के जागांवर प्रवेश झाले होते. विविध कारणांनी उर्वरित जागा रिक्त राहिल्या असल्यातरी या जागांवर यावर्षी विद्यार्थ्यांना या सर्व जागांवर प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे.
जिल्हानिहाय जागा;
ंअभियांत्रिकी महाविद्यालये
नाशिक १९-७६०६
अहमदनगर १२-४००५
जळगाव १०-३१२०
धुळे ०५-१८६०
नंदुरबार ०२-१२६०