जिल्ह्यात १६ हजार  घरे अजूनही अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:20 AM2018-05-14T00:20:39+5:302018-05-14T00:20:39+5:30

डिसेंबर २०१८ पर्यंत देशातील सर्व घरांमध्ये वीज पोहचविण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर बिजली योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजना आणली आहे. नाशिक परिमंडळातदेखील या योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असून, नाशिक ग्रामीण विभागात गटनिहाय कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र जिल्ह्यातील सोळा हजांरापेक्षा जास्त घरांमध्ये अद्यापही वीज पोहचलेलीच नाही

 16 thousand houses are still in the dark | जिल्ह्यात १६ हजार  घरे अजूनही अंधारात

जिल्ह्यात १६ हजार  घरे अजूनही अंधारात

Next

नाशिक : डिसेंबर २०१८ पर्यंत देशातील सर्व घरांमध्ये वीज पोहचविण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर बिजली योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजना आणली आहे. नाशिक परिमंडळातदेखील या योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असून, नाशिक ग्रामीण विभागात गटनिहाय कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र जिल्ह्यातील सोळा हजांरापेक्षा जास्त घरांमध्ये अद्यापही वीज पोहचलेलीच नाही. असे असताना टार्गेट कमी करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.  ग्रामीण व शहरी भागातील एकही घर विना वीजजोडणी राहणार नाही, याची दक्षता सौभाग्य योजनेतून घेण्यात येणार आहे. डिसेंबर-२०१८ अखेरपर्यंत योजनेचे लक्ष्य साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेतून गोरगरिबांना (दारिद्र्यरेषेखालील कुटुंब) मोफत वीज जोडणीसोबतच एक एलइडी बल्ब आणि एक पिनपॉइंट फिटिंग विनाशुल्क करून देण्यात येणार आहे, तर वीजजोडणीपासून वंचित असलेल्या इतर नागरिकांना (दारिद्र्यरेषेवरील कुटुंबे) अवघ्या ५०० रुपयांमध्ये वीजजोडणी मिळणार आहे. जिल्ह्यात १७ हजार ८०८ घरांना वीजजोडणी देण्यात आलेली आहे, तर १६ हजार ८६० घरांना अद्याप विजेची  प्रतीक्षा आहे. दारिद्र्यरेषेखालील आणि रेषेवरील कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात विद्युतीकरण जोरात सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी नाशिक परिमंडळाच्या दप्तरी नाशिक जिल्ह्यातील तालुकानिहाय विद्युतीकरणाची आकडेवारीच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
अशी आहे योजना
४ग्रामीण व शहरी भागातील एकही घर विना वीजजोडणी राहणार नाही, याची दक्षता सौभाग्य योजनेतून घेण्यात येणार आहे. डिसेंबर २०१८ अखेरपर्यंत योजनेचे लक्ष्य साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेतून गोरगरिबांना (दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे) मोफत वीजजोडणीसोबतच एक एलइडी बल्ब आणि एक पिनपॉइंट फिटिंग विनाशुल्क करून देण्यात येणार आहे, तर वीजजोडणीपासून वंचित असलेल्या इतर नागरिकांना (दारिद्र्यरेषेवरील कुटुंबे) अवघ्या ५०० रु पयांमध्ये वीजजोडणी मिळणार आहे. हे शुल्कही नियमित वीजबिलासोबत दहा समान हप्त्यात भरावयाचे आहे. आतापर्यंत विद्युतीकरण न झालेल्या देशभरातील चार कोटी ग्राहकांच्या घरापर्यंत वीज पोहचविण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना आणली असून, त्यासाठी १६ हजार कोटी रु पयांची तरतूद करण्यात आली आहे. अतिदुर्गम भागातील घरांचे विद्युतीकरण करण्यासाठी सौर ऊर्जेचा उपयोग करण्यात येणार आहे. यातून रोजगाराच्या संधी वाढण्यासोबतच स्त्रियांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत मिळणार आहे.
गावे विद्युतीकरण मोजणीची अजब तहा
गावाचे विद्युतीकरण झाल्याबाबत अजब निष्कर्ष काढला जात आहे. ज्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, शाळा, पाणीपुरवठा योजना यांना वीजपुरवठा करण्यात आला आहे याबरोबरच १० टक्के घरांना वीजजोडणी असेल तर ते गाव विद्युतीकरण झाल्याचे जाहीर केले जाते. दहा टक्केनुसार म्हणजे शंभर घरांचे गाव असेल आणि दहा घरांना वीज दिली तरी ते गाव विद्युतीकरण झाले असे जाहीर केले जाते. अशा प्रकारे विद्युतीकरणाची व्याख्या केली जात असून, या पद्धतीने विद्युतीकरणासाठीच मोहीम सुरू करण्यात आली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत जास्तीत जास्त घरांमध्ये वीज पोहचविण्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात दहापटीप्रमाणेच घरांमध्ये वीज पोहचणार आहे.

Web Title:  16 thousand houses are still in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज