१६ गाव पाणीपुरवठा पाइपलाइन कुचकामी लासलगाव : दुरुस्तीचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:29 PM2018-03-22T23:29:16+5:302018-03-22T23:29:16+5:30

लासलगाव : लासलगाव - विंचूरसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन वारंवार लिकेज होत आहे.

16 Village water supply pipeline inefficiently Lasalgaon: Repair work started | १६ गाव पाणीपुरवठा पाइपलाइन कुचकामी लासलगाव : दुरुस्तीचे काम सुरू

१६ गाव पाणीपुरवठा पाइपलाइन कुचकामी लासलगाव : दुरुस्तीचे काम सुरू

Next

लासलगाव : लासलगाव - विंचूरसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन वारंवार लिकेज होत आहे. सदर पाइपलाइनच्या दुरुस्तीसाठी लासलगाव ग्रामपंचायतीने ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्या प्रस्तावास मान्यता देऊन दुरुस्तीचे काम सुरू करावे, असे लासलगाव - विंचूरसह १६ गाव पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. लासलगाव - विंचूरसह १६ गाव पाणीपुरवठा योजना सन २०१० पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून समितीस हस्तांतरित करण्यात आली आहे. सदर योजनेची पाइपलाइन १५ ते २० वर्षापूर्वी टाकण्यात आलेली असून, ती जीर्ण व खराब झाली आहे. सदर पाइपलाइन कायम फुटत असते. लासलगाव पाणीपुरवठा समितीस सदरच्या पाइपलाइनची गळती थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येतो. लोखंडी पाइपलाइन असल्याने जेसीबीद्वारे खोदाई करून वेल्डिंग मशीनने गळती काढावी लागते. गळती काढण्याकरिता पूर्ण पाइपलाइन रिकामी करावी लागते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. गळती काढल्यानंतर पुन्हा पाइपलाइन भरण्यास ५ ते ६ तास लागतात. त्यामुळे विनाकारण वीज जळते. एवढा भुर्दंड पाणीपुरवठा योजना समिती सहन करते. गळतीमुळे नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा करणे अशक्य होते.

Web Title: 16 Village water supply pipeline inefficiently Lasalgaon: Repair work started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी