जिल्ह्यात १६०० गावे कोरोनामुक्त; निफाड, सिन्नर अजूनही हॉटस्पॉट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:19 AM2021-08-18T04:19:42+5:302021-08-18T04:19:42+5:30
गेल्या मार्च महिन्यापासून शहरी व ग्रामीण भागात ठाण मांडून बसलेल्या कोरोनामुळे सुमारे तीन लाखांहून अधिक नागरिकांना बाधित करून त्यातील ...
गेल्या मार्च महिन्यापासून शहरी व ग्रामीण भागात ठाण मांडून बसलेल्या कोरोनामुळे सुमारे तीन लाखांहून अधिक नागरिकांना बाधित करून त्यातील साडेआठ हजार लोकांचे बळी घेतले आहेत. जिल्ह्यातील १९०७ गावांपैकी आदिवासी वाडे, पाडे, वस्तीवगळता अन्य सर्वत्र कोरोनाने थैमान घातले होते. त्यातून नागरिकांना बाहेर काढताना आरोग्य विभागाला महत्प्रयास करावा लागला. अखेर जून महिन्यापासून हळूहळू कोरोनाने काढता पाय घेतला असून, सद्य:स्थितीत सर्वच पंधरा तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दोन आकड्यावर पोहोचली आहे.
---
जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावे
१) बागलाण- १४१
२) चांदवड- १०३
३) देवळा- ४४
४) दिंडोरी- १२२
५) इगतपुरी- ११५
६) कळवण- १५०
७) मालेगाव- ११३
८) नांदगाव- ९४
९) नाशिक- ६३
१०) निफाड- ९५
११) पेठ- १४५
१२) सिन्नर- ७९
१३) सुरगाणा- १९०
१४) त्र्यंबक- ११७
१५) येवला- ३६
-----------
दररोज एक हजार चाचण्या
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम असल्यामुळे कोरोनासदृश लक्षणे दिसल्यास तात्काळ संबंधितांची कोरोना चाचणी केली जात असून, दररोज साधारणतः एक हजार रुग्णांची चाचणी केली जात असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
----------
निफाड, सिन्नर हॉटस्पॉट
जिल्ह्यातील निफाड, सिन्नर हे दोन तालुके अजूनही हॉटस्पॉट आहेत. नाशिकसह अन्य मोठ्या शहरांसह या तालुक्यांचा असलेल्या संंबंधांमुळे कोरोनाचा प्रसार वेगाने पसरतो.