जिल्ह्यात १६२ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:14 AM2021-02-08T04:14:02+5:302021-02-08T04:14:02+5:30
नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि. ७) एकूण १६२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, १७७ रुग्ण नव्याने बाधित झाले ...
नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि. ७) एकूण १६२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, १७७ रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत. दरम्यान, नाशिक मनपा क्षेत्रात दोन तर ग्रामीणला एक मृत्यू झाला असल्याने, आतापर्यंतच्या बळींची संख्या २,०५९ वर पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १६ हजार ८२८ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख १३ हजार ५९४ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर १,१७५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९७.२३ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.९५, नाशिक ग्रामीण ९६.२७, मालेगाव शहरात ९३.१९, तर जिल्हाबाह्य ९४.९१ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या ५ लाख ७ हजार ९०६ असून, त्यातील ३ लाख ९० हजार ५९७ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख १६ हजार ८२८ रुग्ण बाधित आढळून आले असून, ४४१ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.