शहरातील १६६ मंगल कार्यालये, लॉन्स अनधिकृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 01:25 AM2018-01-23T01:25:11+5:302018-01-23T01:25:32+5:30
महापालिकेच्या नगररचना विभागाने केलेल्या सर्वेक्षणात शहरातील नियमबाह्य व अनधिकृतपणे वापर असलेले १६६ मंगल कार्यालये व लॉन्स आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक ६५ मंगल कार्यालये व लॉन्सची संख्या एकट्या पंचवटीत आढळून आली आहेत. महापालिकेने आता या अनधिकृत मंगल कार्यालये व लॉन्स यांना नोटिसा बजावल्या आहेत.
नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागाने केलेल्या सर्वेक्षणात शहरातील नियमबाह्य व अनधिकृतपणे वापर असलेले १६६ मंगल कार्यालये व लॉन्स आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक ६५ मंगल कार्यालये व लॉन्सची संख्या एकट्या पंचवटीत आढळून आली आहेत. महापालिकेने आता या अनधिकृत मंगल कार्यालये व लॉन्स यांना नोटिसा बजावल्या आहेत. शहरात मोठ्या प्रमाणावर मंगल कार्यालये व लॉन्स आहेत. प्रामुख्याने, पंचवटीतील औरंगाबादरोडवर, तर शेतकºयांनी पुढे मंगल कार्यालय-लॉन्स आणि मागे शेती असा व्यवसाय थाटलेला आहे. त्यातील बºयाच मंगल कार्यालयांकडून महापालिकेच्या नगररचना विभागाची परवानगी घेण्यात आलेली नाही, तर अनेकांकडून महापालिकेला घरपट्टीही अदा केली जात नाही. त्यामुळे महापालिकेचा मोठ्या प्रमाणावरील महसूल बुडतो आहे. याशिवाय, शहरातील अनेक मंगल कार्यालयांनी अनधिकृतपणे बांधकाम केल्याच्याही तक्रारी मनपाकडे प्राप्त झाल्या आहेत, तर काही जागांवर नियमबाह्यपणे अनधिकृतपणे वापर सुरू आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाने शहरातील सर्व मंगल कार्यालये व लॉन्सचा विभागनिहाय सर्व्हे केला. त्यामध्ये तब्बल १६६ मंगल कार्यालये व लॉन्स अनधिकृत आढळून आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक संख्या पंचवटीत ६५ इतकी आढळून आलेली आहे. नगररचना विभागाने आता या मंगल कार्यालये व लॉन्सचालकांना नोटिसा बजावल्या असून, नियमबाह्य वापर थांबविला नाही, तर अतिक्रमण विभागाकडून पोलीस बंदोबस्तात कारवाई केली जाणार आहे. नगररचना विभागाने केलेल्या सर्वेक्षणात नामांकित लोकांचे मंगल कार्यालये व लॉन्स अनधिकृत आढळून आलेली असून, त्यात आजी-माजी नगरसेवकांच्या मालकीच्या मंगल कायालये-लॉन्सचाही समावेश आहे.
तळघरांमध्ये १४ हॉटेल्स
महापालिकेने टेरेसवर अनधिकृतपणे सुरू असलेल्या ३८ हॉटेल्सला नोटिसा बजावल्या असतानाच अनधिकृतपणे इमारतीच्या तळघरांमध्ये सुरू असलेल्या १४ हॉटेल्सलाही नोटिसा बजावल्या आहेत. त्यात, पश्चिममधील विकी सागर, १२ टू १२ हॉटेल, फ्रंट पेज, पंचवटी इलाइट, हॉटेल फर्माईश, हॉटेल सत्कार व कोपा कबाना हॉटेल, नाशिक पूर्वमध्ये हॉटेल सिंग पॅलेस, हॉटेल कामत, पंचवटी विभागात हॉटेल गोंधळ, राही हॉटेल, न्यू पंजाब आणि हॉटेल प्राइड तसेच नाशिकरोड विभागातील साईलीला हॉटेल यांचा समावेश आहे. या हॉटेल्सचालकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत.