महाविद्यालयातील १७ विद्यार्थिनी पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 01:28 AM2022-01-03T01:28:19+5:302022-01-03T01:28:37+5:30

 पंचवटीतील केबीएच दंत महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहातील तब्बल १७ विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांमध्येही कोरोनाची भीती पसरली आहे.

17 college students positive | महाविद्यालयातील १७ विद्यार्थिनी पॉझिटिव्ह

महाविद्यालयातील १७ विद्यार्थिनी पॉझिटिव्ह

Next

नाशिक :  पंचवटीतील केबीएच दंत महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहातील तब्बल १७ विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांमध्येही कोरोनाची भीती पसरली आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थिनी कोरोनाग्रस्त असल्याच्या वृत्ताला महापालिकेच्या सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अजिता साळुंके यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी वसतिगृह व्यवस्थापनाने ५२ विद्यार्थिनींचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यात काही विद्यार्थिनी पॉझिटिव्ह आलेल्या होत्या. त्यानंतर मनपा पथकाने वसतिगृहात जाऊन पाहणी केली. ज्या विद्यार्थिनी पॉझिटिव्ह आल्या त्यांना वसतिगृहातच विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. गरज भासल्यास विद्यार्थिनींना पुढील उपचारासाठी मनपा कोविड सेंटरमध्ये हलविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनाबाधित आढळून आलेल्या मुली बाहेरगावाहून आलेल्या असल्याचे महाविद्यालय प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण शंभरीपार !
जिल्ह्यात रविवारी (दि.०२) दिवसभरात एकूण ११७ रुग्ण नव्याने बाधित आढळले असून, ६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या शंभरीपार पोहोचल्याने उपचारार्थी रुग्णसंख्येत मोठी भर पडत असल्याने तीन दिवसांपूर्वी चारशेपर्यंत पोहोचलेली संख्या रविवारी ६९१ पर्यंत पोहोचली आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सलग वाढ होत असताना दिलासा देणारी बाब म्हणजे दिवसभरात एकाही कोरोना बळीची नोंद झालेली नाही. जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असताना प्रलंबित अहवालांच्या संख्येत मात्र लक्षणीय घट झाली असून, ही संख्या १८९ पर्यंत कमी झाली आहे. त्यात नाशिक मनपा १४६, नाशिक ग्रामीण ३२, तर मालेगाव मनपाचे ११ अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान कोरोनामुक्ततेच्या प्रमाणात पुन्हा अल्पशी घट येऊन ते ९७.७२ टक्के झाले आहे. दरम्यान, कोरोनाबाधित संख्येत मोठी वाढ झाल्याने कोराेना उपचारार्थी संख्यादेखील सातशेनजीक अर्थात ६९१ पर्यंत पोहोचली आहे.

इन्फो
सलग दुसऱ्या दिवशी शून्य बळी

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी बळींची संख्या शून्य असल्याचा यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच गत आडवडाभरात तीनवेळा कोरोना बळी शून्य राहिले आहेत. रुग्णसंख्या वाढत असताना काहीसा दिलासा बळींमध्ये मिळाला असला तरी तो वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कितपत कायम राहील याबाबत साशंकताच आहे.

Web Title: 17 college students positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.