मालेगावसह परिसरात पुन्हा १७ कोरोना बाधीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 09:39 PM2020-07-20T21:39:26+5:302020-07-21T02:00:28+5:30

मालेगाव : शहर-परिसरात सोमवारी (दि.२०) मिळालेल्या ८५ अहवालांपैकी १७ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह मिळाले असून ६८ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. शहरात कोरोनाबाधीत रुग्ण कमी होत असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात येत असला तरी शहरासह तालुक्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

17 corona affected in Malegaon area again | मालेगावसह परिसरात पुन्हा १७ कोरोना बाधीत

मालेगावसह परिसरात पुन्हा १७ कोरोना बाधीत

googlenewsNext

मालेगाव : शहर-परिसरात सोमवारी (दि.२०) मिळालेल्या ८५ अहवालांपैकी १७ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह मिळाले असून ६८ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. शहरात कोरोनाबाधीत रुग्ण कमी होत असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात येत असला तरी शहरासह तालुक्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
या अहवालामध्ये मालेगाव कॅम्पातील सिंधी कॉलनीतील ५५ वर्षीय इसम, कृषीनगरमधील मानव पार्क भागात सप्तशृंगी बंगला येथील २९ वर्षीय पुरुष, दाभाडी शिवारातील ४१ वर्षीय पुरुष, कॅम्पातील शाहूनगर भागातील ४१ वर्षीय तरुण, कॅम्पातील गवळीवाडा भागातील ४९ वर्षीय पुरुष बाधीत मिळाला. तालुक्यातील झोडगे येथील वाणी गल्लीतील ५४ वर्षीय पुरुष, २६ वर्षीय महिला, झोडगेतील राममंदिर जवळील ५२ वर्षीय पुरुष बाधीत मिळाले. दाभाडी-काष्टी रस्त्यावर राहणाऱ्या ३९ वर्षीय महिला आणि दहा वर्षांची बालिका बाधीत मिळाली. द्याने येथील आंबेडकरनगरात दोन बाधीत मिळून आले. यात ३३ वर्षांचा पुरुष व पाच वर्षाच्या बालकाचा समावेश आहे. तालुक्यातील रावळगाव येथेही कोरोनाबाधीतांची संख्या वाढू लागली आहे. आज आलेल्या अहवालात पाच जण बाधीत मिळून आले. यात २० वर्षीय तरुणी, ३४ वर्षीय पुरुष, ४४ वर्षीय महिला, १७ वर्षीय बालिका व १४ वर्षांचा मुलगा बाधीत मिळून आला.
येवला तालुक्यात १३ बाधित
येवला शहरासह तालुक्यातील १३ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. रविवारी, (दि.१९) रात्री उशीरा बाधितांच्या संपर्कातील १७ संशयितांचे अहवाल आले असून त्यात १३ पॉझीटीव्ह तर ४ अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
बाधितांमध्ये शहरातील पटणी गल्लीतील एकाच कुटुंबातील ७, नागडे येथील बाधिताच्या कुटुंबातील तिघांचा तर शहरातील दोघांसह सातारे, भायखेडा, पारेगाव येथील प्रत्येकी एका बाधिताचा समावेश आहे. दरम्यान, २४ अहवालांची प्रतिक्षा आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या २१९ झाली आहे.आतापर्यंत १७२ जण कोरोनामुक्त झाले असून १६ जणांचा बळी गेला आहे. बाधित अ‍ॅक्टीव्ह रूग्ण संख्या ३१ आहे. त्यातील नाशिक येथील रूग्णालयात ६, बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षात १३ तर नगरसूल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथे १२ रूग्ण उपचार घेत आहेत. याबरोबरच बाभुळगाव येथील विलगीकरण कक्षात ८ हायरिस्क संशयीत रूग्ण कोरंटाईन असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली.
-----------------
पिंपळगाव बसवंत परिसरात ९ जणांना कोरोनाची लागण
पिंपळगाव बसवंत : शहरात रविवारी रात्री उशीरा प्राप्त झालेल्या अहवालात ९ बाधितांची भर पडली आहे. शिवाजीनगर येथे नव्याने २ रु ग्ण तर रानमळा येथील बाधिताच्या कुटुंबातील ६ रु ग्ण तर त्याच ठिकाणातील अजून नव्याने १ असे शहरात ९ रु ग्ण वाढल्याने बाधितांची संख्या ७० वर पोहचली आहे़
रानमळा येथील कोरोना बाधित व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींना कोविड सेंटरमध्ये दाखल करून त्यांच्या घश्याचे नमुने घेतले असता त्यातील सहा रु ग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात ३७ व ४७ वर्षीय महिला तसेच १७ व १८ आणि २४ वर्षाच्या युवकांसह १४ वर्षीय बालिकेचा समावेश आहे.
सिन्नर तालुक्यात ६ अहवाल पॉझिटिव्ह
सिन्नर शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून सोमवारी दुपारी ग्रामीण भागातील ६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या३४४ झाली आहे. शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
सोमवारी प्राप्त अहवालानंतर रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून आले. पास्ते येथील अडीच वर्षाचा मुलगा, २५ वर्षाचा तरुण व पन्नास वर्षीय महिला, मानोरी येथे ३३ व ५८ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत २६६ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. उपजिल्हा रुग्णालयातील करोना केअर सेंटर व नाशिक येथे ६८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

Web Title: 17 corona affected in Malegaon area again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक